Rebel in BJP Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपपुढे बंडखोरांचे आव्‍हान

34 उमेदवार जाहीर : पार्सेकर, पाऊस्कर, इजिदोर, उत्‍पल आक्रमक

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्‍यात प्रथमच विधानसभेच्या सर्व 40 ही जागा लढविण्याची घोषणा केलेल्या भाजपने आज आपली 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रियोळातून संदीप निगळ्‍ये, सावर्डेतून माजी मंत्री दीपक प्रभू पाऊसकर, सांगेतून सावित्री कवळेकर, काणकोणातून इजिदोर फर्नांडिस तर पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट झाला आहे. त्‍यामुळे या सर्वांनी बंडाचे निशाण पुकारत भाजपविरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. परिणामी आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसू शकतो. (BJP in Goa News Updates)

भाजपचा (BJP) डिचोली, कुंभारजुवे, सांताक्रुझ, कळंगुट, कुठ्ठाळी आणि कुडतरी या सहा जागांचा घोळ अजूनही कायम असून, त्‍या उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. यादीमधील सर्वाधिक धक्कादायक गोष्‍ट म्‍हणजे माजी मंत्री मिलिंद नाईक यांना मिळालेली मुरगावची उमेदवारी होय. काँग्रेसने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले.

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर व उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना डावलून त्यांच्याऐवजी सावर्डे मतदारसंघातून माजी आमदार गणेश गावकर आणि काणकोणातून रमेश तवडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे डावलले गेलेल्या नेत्यांनी भाजपविरोधात बंडाचं हत्यार उपसलं आहे.

11 ओबीसी व्‍यक्तींना उमेदवारी

‘आप’ला (Aam Aadmi Party) प्रत्युत्तर म्हणून भाजपने 11 ओबीसी व्‍यक्तींना उमेदवारी जाहीर केली. शिवाय 9 अल्पसंख्याक, 9 सर्वसामान्य, 2 अनुसूचित जमाती (एसटी) आणि 2 अनुसूचित जाती (एससी) समाजातील व्‍यक्तींना उमेदवारी दिली आहे. भाजपही आपप्रमाणेच गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ओबीसी (OBC) कार्ड खेळत असल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT