Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections 2027: विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने आतापासूनच कसली कंबर; दुरावलेल्यांचीही होणार 'घरवापसी'

Sadanand Tanavade: भाजपने सर्वांसाठी आपल्या सदस्यत्वाची कवाडे १ सप्टेंबरपासून खुली करण्याचे ठरविले आहे. देशव्यापी सदस्यत्व मोहीम राज्यातही राबवली जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

भाजपने सर्वांसाठी आपल्या सदस्यत्वाची कवाडे १ सप्टेंबरपासून खुली करण्याचे ठरविले आहे. देशव्यापी सदस्यत्व मोहीम राज्यातही राबवली जाणार आहे. यादरम्यान पक्ष सोडून गेलेले नेते, कार्यकर्ते यांच्याशीही स्थानिक पातळीवर संपर्क साधण्यात येणार आहे. त्यामुळे असे सदस्यत्व कोण घेणार, याकडे भाजपमधील वर्तुळातील मूळ कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत या मोहिमेची माहिती दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक आणि सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते. तानावडे म्हणाले की, २०१४ मध्ये राज्यात सदस्यत्व मोहीम राबवली होती. त्यावेळी ३ लाख ३० हजार जण सदस्य झाले होते. त्यावेळी ५ रुपये शुल्क होते. त्यानंतर २०२१ मध्ये नवे सदस्य नोंदवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. आता जुन्या सदस्यांनाही परत सदस्यत्व घ्यावे लागणार असून ते मोफत आहे.

सदस्यत्वासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण शिबिर झाले. राज्य पातळीवरील शिबिर आज पणजीत झाले. त्याला या मोहिमेचे राष्ट्रीय प्रमुख आणि सरचिटणीस विनोद तावडे व राज्य प्रभारी आशिष सूद उपस्थित होते. त्याला राज्याबाहेर असलेले ५ आमदार अनुपस्थित होते. मी उद्या म्हापसा येथे तर सूद हे मडगाव येथे जिल्हा पातळीवरील शिबिर घेणार आहेत. त्‍यानंतर २७, २८ व २९ ऑगस्ट रोजी मतदारसंघ पातळीवर तर ३१ रोजी शक्तीकेंद्र पातळीवर शिबिरे होतील. क्यूआर कोड स्कॅन करून, मिस्ड कॉल देऊन आणि ऑनलाईन अर्ज करून तसेच प्रत्यक्ष अर्ज भरून सदस्यत्व घेता येणार आहे. त्यासाठी नेतेही राज्यभरातील काही जणांना भेटतील, असे तानावडे म्हणाले.

विधानसभा निवडणूक २०२७ डोळ्यांसमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार निवडून देईल, असा विश्वासही तानावडे यांनी व्यक्त केला. त्यांनी सदस्यत्व संख्येचे विशेषतः सासष्टीसाठी किती लक्ष्य ठेवले, हे सांगण्यास नकार दिला. राज्यभरात ही मोहीम राबवली जाईल. साहजिकपणे मागच्या सदस्य संख्येपेक्षा जास्त सदस्य होतील, असे ते म्हणाले.

- जे. पी. नड्डा शनिवारी गोव्यात

भाजप कार्यालय इमारतीची कोनशिला बसविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा २४ रोजी सकाळी ११ वाजता गोव्यात येतील. पावसामुळे कदंब पठारावर १०० जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जाईल, त्याच वेळी ताळगाव येथील समाज सभागृहात जाहीर कार्यक्रम होणार आहे. तेथेच सर्वांची भाषणे होतील. कदंब पठारावरील कोनशिला बसविण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ताळगावच्या सभागृहात केले जाईल. नड्डा यांच्याकडे वेळ असल्यास त्यादिवशी गाभा समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल. मात्र मंत्री-आमदारांना स्वतंत्रपणे भेटणे शक्य होणार नाही, असेही तानावडे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सावध भूमिका

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार, असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राज्य प्रभारी आशिष सूद राज्यात दाखल झाल्याने सत्ताधारी गोटात याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. त्याविषयी तानावडे यांना विचारल्यावर ते म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल हवा की नको याविषयी मी सांगू शकत नाही. मुख्यमंत्री राज्यकारभार पाहात असल्याने त्यांनी बदल गरजेचा, असे म्हटले असेल तर मी आता मत व्यक्त करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल तर ते निश्चितपणे कल्पना देतील. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पक्षाचा पाठिंबा नेहमीच असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT