J.P. Nadda in Goa Dainik Gomantak
गोवा

कोणत्याच पक्षात आता ना 'नीती' आहे ना 'नेता'; गोव्यात भाजपला पर्याय नाही: जेपी नड्डा

जेपी नड्डा यांनी मुरीडा-फातोर्डा येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील प्रमुख नेते गोव्यात प्रचारासाठी येत आहेत. आज भाजप पक्षातर्फे त्यांचा जाहीरनामा आणि संकल्प पत्रातील प्रमुख मुद्दे त्यांनी जनतेसमोर सादर केले. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हेदेखील गोव्यात आले आहेत. यावेळी मुरीडा-फातोर्डा येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

ते म्हणाले, 'गोव्याचा आणि देशाचा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. गोव्यात गेल्या दहा वर्षे आणि केंद्रात गेली सात वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे देशाचा आणि गोव्याचाही सर्वांगीण विकास झालेला आहे. हा बहुमोल सर्वव्यापी सर्वांगीण विकास पुढेही चालू राहावा यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार (Goa BJP Government) सत्तेवर येणे नितांत गरजेचे आहे. आणि त्यासाठीच फातोर्डा मतदारसंघातून दामू उर्फ दामोदर नाईक यांना निवडून द्या.' (BJP has no alternative in Goa JP Nadda)

आज फातोर्डा मतदारसंघातील मुरिदा येथे जे पी नड्डा यांची जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, खासदार विनय तेंडुलकर , भाजपाचे फातोर्डाचे उमेदवार दामू नाईक, कारवारच्या आमदार रूपाली नाईक, ठाणेचे आमदार व प्रभारी संजय केळकर फातोर्डा भाजप मंडळाचे पदाधिकारी नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते .

भाजपने गोव्याचा भरीव विकास केलेला आहे. आणि ते विकासाचे रिपोर्ट कार्ड घेऊन भाजप मतदारांसमोर जात आहे . भाजपने कधी जाती-धर्माचे राजकारण केले नाही. सर्व धर्माच्या लोकांसाठी सर्वांचा विकास व्हावा या हेतूने 'सबका साथ सबका विकास' आणि सबका प्रयास या ध्येयाने केंद्रात आणि राज्यातही काम केलेले आहे. भाजपाच्या काळात कुठेही जातीय दंगली झालेल्या नाहीत बॉम्ब स्फोट झालेले नाहीत आणि हे भाजप सरकारचे यश आहे. नागरिकांनी पूर्वीचा काळ आठवून पहावा. आताचा विकसित भारत, विकसित गोवा पाहावा. बंगालमध्ये महिलांवर आणि बालकावर अत्याचार होत आहेत. हजारो गुन्हे नोंदवले जात नाहीत. आणि अशा या पश्चिम बंगालधील तृणमूल काँग्रेस (TMC) गोव्यात लोकांना मोफत देण्याचे आश्वासन देऊन दिशाभूल करताना दिसत आहे. दिल्लीत वीज पुरवठा सुरळीत न करू शकणारे आम आदमी पक्षाचे (AAP) नेते गोव्यात मोफत वीज देण्याचे आश्वासन देत आहेत. अशा आश्वासनांना गोवेकरांनी भुलू नये, असेही नड्डा म्हणाले. स्व. मनोहर पर्रीकर यांनी 'गोल्डन गोवा'चे स्वप्न पाहिले आहे, ते स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याच्या उद्देशाने भाजप पावले उचलत आहे . गेल्या दहा वर्षात गोव्याचा झालेला विकास, उभे राहिलेले अनेक प्रकल्प , रस्त्यांचे जाळे, अनेक योजनांची अंमलबजावणी ही पर्रीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेली पावले असून डॉ. प्रमोद सावंत पर्रीकर यांचे स्वप्न निश्चितच पूर्ण करतील, असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला.

गोव्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभारताना आरोग्य सुविधांमध्ये अनेक नवीन इस्पितळे बांधण्यात आलेली आहेत. गोवा वर्ल्ड क्लास सोसिओ इकॉनोमिक केंद्र व्हावे यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. चार हजार कोटी रुपये आत्मनिर्भर भारताअंतर्गत केंद्र सरकारने गोव्याला दिलेले आहेत. केंद्र आणि राज्य मिळून गोव्याचा डबल इंजिनचे सरकार विकसित गोवा विकसित राज्य करत आहे. आणि हा विकास पुढे चालू राहून मोपा विमानतळ व इतर अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा गोव्यात भाजपची सत्ता हवी. याची जाणीव गोमंतकीयांनी ठेवावी असे त्यांनी सांगितले.

गोव्यात कायदा-सुव्यवस्था चांगला आहे. देशात गुन्हे तपासामध्ये गोवा देशात प्रथम क्रमांकावर आहे. भाजपने महिलांना आत्मसन्मान दिला. त्याच बरोबर अनेक शैक्षणिक प्रकल्पही उभे केले आहेत. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून गोल्डन गोवाचे पर्रीकर यांचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पुन्हा एकदा गोव्यात भाजप सरकार हवे. असे सांगून प्रत्येक मतदारसंघातून भाजपची उमेदवार जिंकायला हवेत .याची जाणीव मतदारांनी ठेवावी आणि दामू नाईक (Damu Naik) यांना बहुमताने निवडून द्यावे. असे आवाहन नड्डा यांनी शेवटी केले .

आपण भारतीय जनता पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडली. दोन वेळा आमदार झालो. स्वर्गवासी मनोहर पर्रीकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले आणि फातोर्डाचा शक्य तेवढा विकास केला. त्यानंतर गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झालो. तरी लोकांशी संपर्क तोडलेला नाही. 14 फेब्रुवारी रोजी फातोर्डासियांनी निर्णायक विचार करण्याची गरज आहे. गोव्याच्या विकासासाठी आपणास काय हवं त्याचे चिंतन करा. आणि भाजपा गोव्याचा विकास करू शकतो हे स्पष्ट झालेले असल्यामुळे फातोर्डातून भाजपला विजयी करा. आपण जसा पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे तसाच फातोर्डा वासियांचा आपण सेवक आहे आणि या सेवाभावीपणे लोकांची सेवा करणार आहे. असे प्रतिपादन यावेळी दामू नाईक यांनी केले .

गोव्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा .गोव्याच्या हितासाठी फातोर्डा च्या मतदारांनी जात-धर्म मानू नये. दामू सारखा सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता पुन्हा एकदा आमदार होण्याची गरज असून म्हणून त्याला निवडून द्या, असे आवाहन यावेळी प्रसिद्ध तियात्रीष्ट हर्बर्ट फर्नाडीस यानी केले. इतर मान्यवरांची ही यावेळी समयोचित भाषणे झाली. दामू नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

कोणत्याच पक्षात आता ना 'नीती' आहे ना 'नेता' आहे.

सभेच्या शेवटी जे पी नड्डा यांनी सर्व पक्षांवर टोला लगावत म्हटले की, सध्याचे राजकारण फक्त घराणेशाहीचे झालेआहे. कुठल्याही राज्यातले, कुठलेही सरकार किंवा कोणताही पक्ष पाहिल्यास घराणेशाही, वंशवादी आहेत हे जाणवते. फक्त भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो फक्त जनतेसाठी काम करत आहे. आता कोणत्याच पक्षाकडे ना 'नेता' आहे ना 'नीती' आहे; पण भाजपपडे मोदींपासून प्रमोद सावंतपर्यंत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत नेत्यांची शृंखला आहे. त्यामुळे जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या आधीची विकास कामे लक्षात घेऊन पुन्हा एकदा भाजपचे सरकार गोव्यात आणावे, जेणेकरून जनतेला स्थिर सरकार मिळू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

IFFI 2024: मराठी कलाकारांची 'शोलेला' मानवंदना! अभिनेत्री प्राजक्ता दातारने म्हणला Iconic Dialogue; ‘बसंती, इन कुत्तों के सामने..'

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT