Manohar Parrikar BJP : भाजप पूर्वी तत्त्वांचे राजकारण करत होता; आता 'सत्तेचे राजकारण' करत आहे... Dainik Gomantak
गोवा

भाजप पूर्वी तत्त्वांचे राजकारण करत होता; आता 'सत्तेचे राजकारण' करत आहे...

पूर्वीची आणि आताच्या परिस्थितीतील फरक स्पष्ट करताना ॲड. जगदीश प्रभुदेसाई यांचा भाजपला टोला..

दैनिक गोमन्तक

भाजपची बुनियाद गोव्यात दृढ करण्यात ज्यांनी मोठे योगदान दिले, त्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची तत्त्वे भाजप (BJP) विसरला आहे का असा प्रश्न त्यांच्या आज होणाऱ्या जयंतीनिमित्त अनेक भाजपप्रेमींना सतावू लागला आहे.

सध्या भाजपातील मंत्र्यांवर त्यांचेच आमदार भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. त्यापूर्वी आणखी एका मंत्र्यांवर एका कथित लैंगिक कांडासाठी कारवाई करावी अशी मागणी एका मंत्र्यानेच केली होती. राज्यात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Swant) त्या आरोपांना समर्पक उत्तर देऊ शकत नाहीत. एकप्रकारची नवी राजकीय संस्कृती भाजपात तयार होऊ लागली आहे अशी भावना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे. त्यामुळेच त्यांना पर्रीकरांची तीव्र आठवण येऊ लागली आहे.

पर्रीकर, पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर या त्यावेळच्या बिनीच्या स्थानिक नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले भाजपचे जुने नेते ॲड. जगदीश प्रभुदेसाई यांनी त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीतील फरक स्पष्ट करताना, पूर्वी भाजप कार्यकर्त्यांत जी सकारात्मकता होती ती आता कमी झाली आहे. पूर्वी भाजप कार्यकर्ते तत्त्वांचे राजकारण करत होता, आता सत्तेचे राजकारण सुरू झाले आहे, असे मत व्यक्त केले.

पर्रीकर यांचे निधन झाल्यावर सरकार स्थिर करण्याच्या नावाखाली काँग्रेसचे (Congress) अकरा आमदार फोडून भाजपमध्ये आणल्यावर भाजपची संस्कृतीच बदलली अशी भावना सध्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दृढ होऊ लागली आहे, हे जुन्या कार्यकर्त्यांशी बोलताना कळून येते.

पर्रीकर यांच्या समर्थक असलेल्या भाजप राज्य कार्यकरिणीच्या माजी उपाध्यक्ष निना नाईक यांनीही अशीच भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, भाजपचे मूळ आमदार हे संघाच्या मुशीतून तयार झालेले त्यामुळे त्यांची तत्त्वे बदलली आहेत असे मला वाटत नाही, पण सध्या गोव्यातील भाजपात जे काय चालले आहे ते पाहता, सत्तेसाठी काहीही करण्यासाठी ही मंडळीही आता मागे राहिलेली नाही असेच वाटते.

कुडचडे येथील माजी नगरसेवक आनंद प्रभुदेसाई यांनी सध्याच्या भाजप नेतृत्वावर टीका करताना सध्याची भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी जनता पार्टी झाली असल्याची टीका केली.

कुडचडेचे नगरसेवक आणि भाजप मंडळाचे माजी सदस्य प्रदीप नाईक यांनी सध्या पक्षात आलेल्या दुसऱ्या पक्षातील आमदारांनी आपले कार्यकर्ते पक्षात आणले असून या नव भाजप कार्यकर्त्यांसमोर जुने कार्यकर्ते अडगळीत पडू लागले आहेत. त्यामुळे पर्रीकरांची आठवण तीव्रतेने येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनोहर पर्रीकर यांनी 2012 मध्ये सत्तेवर आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांच्या नेमणुका बेकायदेशीरतेचा ठपका ठेवून रद्द केल्या होत्या. पर्रीकर यांनी ही जी तत्त्वे निर्माण केली त्याचा नाश करण्याचे काम सध्याचे भाजप सरकार करीत आहे. पर्रीकर आज असते, तर अशाप्रकारच्या नेमणुकांमधील हस्तक्षेप आणि घोटाळा त्यांनी खपवून घेतला नसता.

- पराग हेदे, समाज कार्यकर्ते

पर्रीकर यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी लोकांना पसंत पडायचा. त्यांचा आपल्या आमदारावरही वचक होता. सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे याच दोन गोष्टी नाहीत. त्यामुळे आमदारही त्यांना जुमानत नाहीत. पर्रीकर हे नेते होते. सावंत त्यांच्या जवळही येऊ शकत नाहीत.

- ॲड. राधाराव ग्रीसीयस, राजकीय भाष्यकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

SCROLL FOR NEXT