पोरस्कडेत स्‍थानिक-पर्यटकांत राडा, गाडयांच्या तोडफोडीसह एकजण जखमी

दंडुके व शस्‍त्राने हल्ला केल्‍यानंतर देशी पर्यटकांनी दगडफेक करून वाहनांच्‍या काचा फोडल्या.
Goa Crime: Major clashes in Porskade in goa among tourists and citizens
Goa Crime: Major clashes in Porskade in goa among tourists and citizensDainik Gomantak
Published on
Updated on

पोरस्कडे-पेडणे येथे कोकण रेल्वे पुलाजवळ महामार्गावर रविवारी दुपारी कोरेगाव-सातारा येथून आलेले पर्यटक व क्रिकेट खेळून कारने घरी परतणारे नयबाग येथील स्थानिक युवक यांच्यामध्ये राडा झाला. या राड्यात नयबाग येथील संतोष नारायण स्वार (वय 21) हा गंभीर जखमी झाला. पर्यटकांमध्‍ये झालेल्‍या बाचाबाचीत स्थानिकांच्या एका कारची, तर कराड येथील पर्यटकांच्या दोन टेंपो ट्रॅक्सच्या काचा फुटल्या. वाहनांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत कराडहून आलेले पर्यटक आपल्या गावी जात असता सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी त्यांची तिन्ही वाहने ताब्यात घेतली व पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता.(Major clashes in Porskade in goa among tourists and citizens)

नयबाग येथील युवक तोर्से-पेडणे येथील क्रिकेट सामना आटोपून घरी परतत असताना ही घटना घडली. रविवारी दुपारी पोरस्कडे येथील कोकण रेल्वे पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ते पोहोचले असता तिथे दोन टेंपो ट्रॅक्स व एक कार थांबवून देशी पर्यटक मद्यधुंद अवस्थेत मार्गावरच नाचत होते व दगडफेकही करत होते. त्‍यांना कशाचेही भान नव्‍हते.

दरम्यान, गोवा राज्य शिवसेना उप राज्य प्रमुख सुभाष केरकर यांनी घटनेची माहिती समजावून घेउन जखमी संतोष स्वार व इतरांची चौकशी केली. या घटनेमुळे पेडणे तालुक्‍यात उद्दाम पर्यटकांबद्दल नाराजी व्‍यक्त केली जात आहे. सरकारने त्‍यांच्‍यावर नियंत्रण न ठेवल्‍यास यासारखे राडे सर्वत्र होतील, असा इशारा पेडणेवासीयांनी दिला.

Goa Crime: Major clashes in Porskade in goa among tourists and citizens
Goa: झुआरीनगर- सांकवाळ येथे अज्ञातांकडून हत्या

दंडुके व शस्‍त्राने हल्ला केल्‍यानंतर देशी पर्यटकांनी दगडफेक करून वाहनांच्‍या काचा फोडल्या. अचानक घडलेल्‍या प्रसंगामुळे क्रिकेट खेळून आलेले युवक गोंधळले. नयबाग येथील युवकांनीही त्‍यांना प्रतिकार केला. त्यात कोरेगाव-सातारा येथील तिन्ही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्‍या. या घटनेतंर ते पर्यटक सावंतवाडीच्‍या दिशेने पळाले. मात्र, सावंतवाडी पोलिसांनी या वाहनांची स्थिती पाहून ती चौकशीसाठी ताब्यात घेतली. अखेर राडा झाल्‍याचे उघड झाल्‍यावर ती वाहने पर्यटकांसह पेडणे पोलिसांच्या स्वाधीन केली. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी कोरेगाव-सातारा येथील विनय पोपट, आकाश येवळे, जीवन नाना येवळे, अशोक रघुनाथ येवळे, अश्विन भारत येवळे, संकल्प कुमार येवळे, प्रफुल्ल विशाल येवळे, सूरज राजेंद्र सबकाळ, अनंतराव प्रल्हाद सबकाळ या संशयितांच्या विरोधात पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पेडणे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश वायंगणकर हे पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com