Yuri Alemao | Goa Government  Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: रोजगारनिर्मितीत भाजप अपयशी; युरी आलेमाव यांचा आरोप

Yuri Alemao: आलेमाव: ‘हर ऑफिस ग्रॅज्युएट’साठी कृती आराखडा हवा

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao:

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर ‘हर घर पदवीधर’चे कठोर वास्तव स्वीकारले. भाजप सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने अनेक पदवीधर घरी बसले आहेत. गोव्यात ‘हर ऑफिस ग्रॅज्युएट’ साध्य करण्यासाठी कृती आराखड्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

प्रत्येक घरात पदवीधर हवा, असे आपले स्वप्न आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी गोव्यातील वाढत्या बेरोजगारीवर नियंत्रण ठेवण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याबद्दल टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाने यापूर्वीच बेरोजगारी दरामध्ये गोवा राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्ट केले होते. सीएमआयईच्या अहवालांनी गोव्यातील बेरोजगारीही उघड केली आहे.

भाजप सरकारने मेगा जॉब फेअरवर जवळपास ४ कोटी रुपये खर्च केले, जिथे जवळपास २२००० बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली. सरकारने अखेर केवळ ५०० तरुणांनाच कंत्राटी किंवा तात्पुरत्या आधारावर नोकऱ्या दिल्याचे मान्य केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप कार्यक्रम जाहीर केला, जो शाळा सोडणाऱ्यांना प्रोत्साहन देतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

‘गोवा व्हिजन’ कार्यान्वित करा'

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गेल्या काही वर्षांत गोवा विद्यापीठाच्या क्रमवारीत घसरणीचे आत्मपरीक्षण करावे.

2021 मध्ये काँग्रेस सरकारने स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा सुवर्ण जयंती समितीने तयार केलेला ‘गोवा व्हिजन अहवाल’ कार्यान्वित केल्यास गोव्यातील बेरोजगारी सोडविण्यास मदत होईल, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmal Panchayat Issue: आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाची दुर्दशा! हरमलमधील भटवाडी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालक आणि ग्रामस्थ हैराण

Papaya Cultivation Goa: पपई उत्पादनात राज्यात फोंडा तालुका अग्रेसर! कृषी अहवालातून खुलासा, 155 हेक्टर क्षेत्रात 2583 टन उत्पादन

Bardez Stray Animals: भटक्या कुत्र्यांसोबत मोकाट गुरेही बनली डोकेदुखी, बार्देशात शेतकरी हवालदिल; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Fatorda Stadium Leak: 'आनी हेंका रोनाल्डो जाय', ऐन सामन्यात फातोर्डा स्टेडियमला गळती, गोव्याच्या फुटबॉल उत्सवाला गालबोट; Watch Video

Bicholim Markt: डिचोली बाजारात कांदे-बटाट्यांच्या खरेदीला जोर! इतर भाज्यांच्या तुटवड्यामुळे ग्राहकांत नाराजी; कर्नाटकातून पुरवठा ठप्प

SCROLL FOR NEXT