Goa News: भारताला संधींची भूमी बनवूया; पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
Dainik Gomantak

Goa News: भारताला संधींची भूमी बनवूया; पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर

रघुनाथ माशेलकर : भाऊसाहेबांमधील दातृत्व, चिकाटी, कलाप्रियता आत्मसात करा
Published on

भारत हा विचारांचा देश आहे. या देशातील तरुणांनी उच्च विचारसरणी ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. भारताला जर संधींची भूमी बनवायची असेल तर त्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यांनी हे आव्हान स्वीकारायला हवे, असे मत महान शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

Goa News: भारताला संधींची भूमी बनवूया; पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
Salgaon Waste Project: साळगाव प्रकल्पात दक्षिण गोव्यातील कचरा? स्थानिकांनी कचरावाहू ट्रक रोखला!

पणजी जिमखाना येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ५०व्या पुण्यतिथी कार्यक्रमात माशेलकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, आपण सर्व भाऊसाहेब बांदोडकरांचे कुटुंब आहोत. मला असे वाटण्याचे कारण म्हणजे, ते एक जिवंत संस्था होते. त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य हे आगामी पिढ्यांना सतत प्रेरणा देणारे असेल.

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझी आणि भाऊंची भेट एका सत्कार समारंभात झाली होती.

Goa News: भारताला संधींची भूमी बनवूया; पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
Drunk and Drive प्रकरणी पोलिस अलर्ट मोडवर, उत्तर गोव्यात दोन दिवसांत तब्बल 'एवढ्या' मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

जिथे मला शैक्षणिक गुणवत्तेमुळे सन्मानित केले जात होते. त्यावेळी भाऊंनी माझ्या पाठीवरून हात फिरवत ‘खूप शिक, मोठा हो आणि गोव्याचे नाव मोठे कर,’ असे म्हणत प्रोत्साहन दिले होते. भाऊसाहेबांकडे दातृत्व, चिकाटी, कलाप्रियता आणि प्रेम हे गुण होते, जे आपण आत्मसात केले पाहिजेत.

- डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ

भाऊसाहेब बांदोडकर हे एक महान द्रष्टे नेते होते, ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि खेड्यापाड्यांत शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे गोव्यात उच्च साक्षरता दर गाठण्यास मदत झाली. त्यांनी ग्रामीण विकासावर भर दिला. राज्यात प्रगतिशील कामे आणली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील पर्यटन शाश्वत केले. एक वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानमाला होणार आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com