Venkatesh Naik Dainik Gomantak
गोवा

भंडारी समाजाला आरक्षण देण्यात भाजप अपयशी: गोवा फॉरवर्ड

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा आरोप फेटाळताना, या पक्षाने भाजप (Bjp) सध्या राजकिय अस्तित्व राखण्यासाठी ’दत्तक नेते’ आयात करत असल्याचे म्हटले आहे.

Manish Jadhav

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) भंडारी समाजाचे नेते व माजी आमदार जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आरोप फेटाळताना, या पक्षाने भाजप (Bjp) सध्या राजकिय अस्तित्व राखण्यासाठी ’दत्तक नेते’ आयात करत असल्याचे म्हटले आहे. फोंड्याचे माजी नगराध्यक्ष व गोवा फॉरवर्डचे नेते व्यंकटेश नाईक (Venkatesh Naik) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार भंडारी समाजाला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे असे म्हटले. यावेळी सरचिटणीस मोहनदास लोलयेकर उपस्थित होते.

नाईक पुढे म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी भंडारी समाजाच्या राखिवतेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता आणि इतर मागासवर्गीयांना देण्यात येणाऱ्या 27 टक्क्यातून त्यांना विशेष राखिवता द्यावी आणि भंडारी समाजाच्या आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली होती. ‘‘परंतु असे असतानाही भाजप सरकार या प्रकरणी पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे.’’ असे नाईक म्हणाले.

गोवा फॉरवर्ड सत्तेत आल्यावर भंडारी समाजाला राखिवतेतील राखिवता देऊन न्याय देईल, असे ते म्हणाले. " या समाजाच्या नेत्यांना पक्षात घेताना भाजपने या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे." असे ते म्हणाले. भंडारी नेते जयेश साळगावकर यांचा वापर समाजाची मते मिळवण्यासाठी केला, हे मुख्यमंत्र्यांचे विधान मोहनदास लोलयेकर यांनी फेटाळले. ‘‘जयेश साळगावकर यांनी हे सांगितले असते तर मी मानले असते. त्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाने तिकीट दिली आणि निवडून आणले व मंत्रीही केले हे सत्य आहे.’’ असे लोलयेकर म्हणाले. "आम्ही भंडारी समाजातून चांगले नेते निवडले आणि त्यांना मंत्रिपदही दिले." असे लोलयेकर म्हणाले.

भंडारी समाजाच्या नेत्यांना पदे देण्यात भाजप अपयशी ठरल्याने मुख्यमंत्र्यांना अशी विधाने करण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. “दत्तप्रसाद नाईक आदी नेते अजुनही भाजप मध्ये आहे, असे असतानाही भाजप इतर पक्षांतून नेते आयात करत आहे. मनोहर पर्रीकर यांच्यासोबत काम करणाऱ्या भंडारी नेत्यांना भाजपने बाजूला केले आहे हे सुद्धा सत्य आहे.’’ असे ते म्हणाले.

‘‘पूर्वी एखाद्या जमीनदाराला जर स्वतःचे मूल नसते, तर ते मुले दत्तक घेत असत, भाजपची सध्या अशीच परिस्थिती झाली आहे असे लोलयेकर म्हणाले. "भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे की त्यांना इतर पक्षांतून या नेत्यांना दत्तक का घ्यावे लागत आहे." असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT