Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: वल्लभभाईंची विचारधारा अंगीकारण्यास भाजप अपयशी

Girish Chodankar: सरदार वल्लभभाई पटेल यांना भाजपने नेता म्हणून स्वीकारले हे चांगले आहे, पण देशाला एकत्र आणण्यासाठी त्यांची विचारधारा अंगीकारण्यात हा पक्ष सपशेल अपयशी ठरला, असा आराेप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज केला.

दैनिक गोमन्तक

Girish Chodankar: सरदार वल्लभभाई पटेल यांना भाजपने नेता म्हणून स्वीकारले हे चांगले आहे, पण देशाला एकत्र आणण्यासाठी त्यांची विचारधारा अंगीकारण्यात हा पक्ष सपशेल अपयशी ठरला, असा आराेप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज केला.

काँग्रेस भवनात वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चोडणकर म्हणाले,

भाजपने सरदार वल्लभभाई पटेल यांना दत्तक घेतले. त्यांना मोठा नेता बनवत आहे हे पण चांगली बाब आहे.

कारण भाजपकडे असे नेते नव्हतेच मुळी. म्हणूनच ते आमच्या नेत्यांना दत्तक घेत आहेत. मात्र, पटेल यांची विचारधारा त्यांनी स्वीकारली नाही याचे वाईट वाटते.

इंदिरा गांधींनी गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या होत्या. अशा प्रकारे गरिबी हटवण्याची क्रांती सुरू झाली. त्‍यांनी बँका आणि विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले, जेणेकरून त्यांचा लोकांना फायदा होईल.

परंतु भाजप सरकार नेमके त्याच्या उलट काम करीत आहे. जिथे देशाची संपत्ती खासगी कंपन्यांना दिली जाते आहे.

काही शक्तींना देशाचे विभाजन करायचे होते, मात्र इंदिरा गांधींनी त्याविरुद्ध लढा दिला. आज त्याच शक्तींनी असंतोष निर्माण केला आहे. अशा प्रयत्नांविरुद्ध लढा देण्याची गरज असल्याचे चाेडणकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT