हेडलॅण्ड सडा येथील एमपीटी रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्याच्या कार्यक्रम उपस्थित मंत्री मिलिंद नाईक.सोबत मंडळाध्यक्ष संजय सातार्डेकर व इतर. Dainik Gomantak
गोवा

Goa: प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून रुग्णांना फळांचे वाटप

शुक्रवारी भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या (Narendra Modi) 71व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

दाबोळी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 71व्या वाढदिवसाप्रित्यर्थ मुरगाव भारतीय जनता पार्टी मंडळातर्फे एमपीटी रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लसीकरणामध्ये भारताने नवा विक्रम प्रस्थापित केला.

भारतात नऊ तासात दोन कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण अभियान उशिरा रात्री पर्यंत चालले होते.दरम्यान मुरगाव भाजपा मंडळातर्फे एमपीटी रुग्णालयात आजारी रुग्णांना फळांचे वाटप केले आणि आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री श्री मिलिंद नाईक, भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेविका मंजूषा पिळणकर, दयानंद नाईक, कुणाली पार्सेकर, दामोदर नाईक, शशिकांत परब, महिला मोर्चा अध्यक्षा छाया होनावरकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री मिलिंद नाईक यांनी,भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांना सुख समृद्धीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली.याचा फायदा सर्व देशवासीय घेत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT