Goa BJP ST Morcha  Dainik Gomanatk
गोवा

Goa BJP: एसटी समाजाला भाजपनेच दिला न्याय; बार्बोझा

Goa BJP ST Morcha: राजकीय आरक्षण देण्यासाठी भाजपनेच पुढाकार घेतला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील एसटी बांधवांना न्याय देण्याचे काम सदोदीत केवळ भाजपने केले आहे. गावडा, कुणबी, वेळीप समाजाला एसटीचा दर्जा, विविध सरकारी योजना तसेच आता एसटीला राजकीय आरक्षण देण्यासाठी भाजपनेच पुढाकार घेतला आहे. काँग्रेसने एसटी समाजासाठी काही केले नाही. केवळ समाज बांधवांत फूट पाडण्याचे काम केल्याचा आरोप भाजप एसटी मोर्चाचे ॲन्थनी बार्बोझा यांनी केला.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, धाकू मडकईकर, सुरेश केपेकर, मोहन गावकर, गोपाळ सुर्लकर उपस्थित होते. बार्बोझा पुढे म्हणाले, की ज्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एसटी समाजाच्या नेत्यांसह गृहमंत्री अमित शहा यांना भेटले

त्यानंतर परत गोव्यात येऊन मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्या पुढाऱ्यांनी तसेच काँग्रेसने उलट्या पत्रकार परिषदा घेत अपप्रचार केला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षण देण्याचा भाजपने दिलेला शब्द पाळला.

‘समाजाने भाजपसोबतच रहावे’

मी ‘गोमन्तक वृत्त वाहिनी’वरील मुलाखतीत पूर्वी सांगितले होते की, आजपर्यंत भाजपनेच आम्हाला न्याय दिला आहे. राजकीय आरक्षण देखील भाजपच देईल. एसटी समाजाला जर कोणी न्याय दिला असेल, तर तो भाजपने दिला आहे. त्यामुळे एसटी समाजाने सदोदीत भाजपसोबत राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन धाकू मडकईकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT