South Goa BJP Candidate Dainik Gomantak
गोवा

South Goa BJP Candidate: दक्षिण गोव्यातून भाजपकडून महिला उमेदवार? 'या' हिंदुत्ववादी चेहऱ्याची चर्चा

दक्षिण गोव्यासाठी महिला उमेदवारांची नावे पाठवणार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती, शेफाली वैद्य, सुवर्णा तेंडुलकर आणि विद्या गावडे यांच्या नावाची चर्चा.

Pramod Yadav

South Goa BJP Candidate

गोव्यातील दोन लोकसभा जागेबाबत उत्तरेत विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पण, दक्षिणेतील तिढा अद्याप कायम असून, आता येथे महिला उमेदवाराची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या पहिल्या 195 उमेदवारांच्या यादीत श्रीपाद भाऊंना सहाव्यांदा संधी देण्यात आली. दक्षिणेत मात्र भाजप नवा चेहरा देऊ शकतो याबाबत दिल्ली दरबारी वारंवार बैठकांच्या फेऱ्या होत आहेत. दक्षिणेतील उमेदवार दुसऱ्या यादीत घोषित केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिण गोव्यात माजी खासदार नरेंद्र सावईकर यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार की माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर किंवा दामू नाईक यांना उमेदवारी दिली जाणार याबाबत सस्पेंस कायम असताना, आता दक्षिणेत भाजप महिला उमेदवाराचा विचार करत असल्याची चर्चा समोर आली आहे.

दक्षिणेत गेल्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे भाजप दक्षिणेत यावेळी सावध आणि विचारपूर्वक भूमिका घेताना दिसत आहे.

दक्षिणेतील उमेदवार विनिंग मेरिटवर ठरवला जाणार की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना, महिला उमेदवाराचा केंद्रीय नेतृत्व विचार करत असल्याची जोरदार चर्चा असून, दक्षिणेत यावेळी महिला उमेदवार भाजपकडून निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. मुख्यंमत्री प्रमोद सावंत यांनी देखील दक्षिणेत महिला उमेदवारांची नावे पाठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, दक्षिण गोव्यातून भाजप प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांचा नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप वरिष्ठांकडून शेफाली वैद्य यांचे नाव सुचवले जात असल्याची सुत्रांची माहिती आहे.

गोव्यातील उमेदवारीबाबत दिल्लीत बैठका सुरु असताना भाजप गोव्यातील एका जागेवर महिला उमेदवाराचा विचार करत असल्याची चर्चा होती. पण, नाव समोर आले नव्हते. आता हे नाव शेफाली वैद्य असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय सुवर्णा तेंडुलकर आणि विद्या गावडे यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

दरम्यान, मूळच्या दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथील रहिवासी असणाऱ्या शेफाली वैद्य यांना भाजप उमेदवारी देणार का इतर दोन पर्यायांपैकी एकाला संधी देणार की पुरुष उमेदवाराची वर्णी लागणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

कोण आहेत शेफाली वैद्य?

शेफाली वैद्य प्रसिद्ध लेखिका असून, त्या वर्तमानपत्रात स्तंभलेखन करतात. मूळ दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथील रहिवासी असून, त्या सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत.

शेफाली वैद्य सोशल मिडियावर अतिशय सक्रिय असतात व भाजपच्या समर्थनात पोस्ट करतात. वैद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक असून भाजपसाठी उघड भूमिका घेताना दिसतात. अनेक सोशल मिडिया त्यांनी विरोधी पक्षांची चिरफाड केल्याच्या पोस्ट व्हायरल होत असतात. प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT