Goa Zilla Panchayat Election | Sandeep Bandodkar  Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election : रेईस मागूशमध्ये भाजपचा झेंडा; संदीप बांदोडकर विजयी

गोव्यात जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Zilla Panchayat Election : गोव्यात जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. रविवारी 16 ऑक्टोबर रोजी दवर्ली, रेईस मागूश आणि कुठ्ठाळी मतदारसंघाच्या तीन जागांसाठी मतदान झालं. यात रेईस मागूश मतदारसंघात भाजपचे संदीप काशिनाथ बांदोडकर विजयी झाले आहेत. तब्बल 4244 च्या मताधिक्याने बांदोडकर यांनी ही निवडणूक जिंकली आहे. या मतदारसंघात 1101 मतं मिळवत अपक्ष उमेदवार साईनाथ कोरगावकर दुसऱ्या स्थानी राहिले. तर 1091 मतांसह राजेश दाभोळकर तिसऱ्या स्थानी आहेत. काँग्रेस उमेदवार प्रगती संदीप पेडणेकर यांनी 509 मतं मिळवली आहेत.

दुसरीकडे आप, काँग्रेस, आरजी आणि अपक्ष यांच्यात भाजप विरोधी मते विभागली गेल्याने दवर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा बाजी मारली. भाजपच्या परेश नाईक यांनी ही निवडणूक 706 मतांनी जिंकताना या मतदारसघात भाजपला विजयाची हॅटट्रिक करून दिली.

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी मतमोजणी संपली तेव्हा भाजपचे परेश नाईक यांना 4080 तर आपचे सिद्धेश भगत याना 3374 मते मिळाली. काँग्रेसचे लियोन रायकर तिसऱ्या क्रमंकावर फेकले गेले त्यांना फक्त 1089 मते घेता आली.

दरम्यान कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार मर्सिआना मेंडिस इ वाझ यांनी 4453 मतं मिळवत विजय संपादन केला आहे. अपक्ष उमेदवार लेस्लि आग्नेलो गामा यांना 1511 तर काँग्रेसच्या वॅलेंट बारबोसा यांना 1360 मतं मिळाली आहेत. तर आम आदमी पार्टीच्या जॉन डिसा यांना 293 मतं मिळाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT