Zilla Panchayat Election : दवर्लीत भाजपची हॅटट्रिक, परेश नाईक यांचा दणदणीत विजय

आप, काँग्रेस, आरजी आणि अपक्ष यांच्यात भाजप विरोधी मते विभागली गेल्याने दवर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा बाजी मारली.
Goa Zilla Panchayat Election | Davorlim Constituency | Paresh Naik Wins
Goa Zilla Panchayat Election | Davorlim Constituency | Paresh Naik WinsDainik Gomantak
Published on
Updated on

Zilla Panchayat Election : आप, काँग्रेस, आरजी आणि अपक्ष यांच्यात भाजप विरोधी मते विभागली गेल्याने दवर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा बाजी मारली. भाजपच्या परेश नाईक यांनी ही निवडणूक 706 मतांनी जिंकताना या मतदारसघात भाजपला विजयाची हॅटट्रिक करून दिली.

जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी मतमोजणी संपली तेव्हा भाजपचे परेश नाईक यांना 4080 तर आपचे सिद्धेश भगत याना 3374 मते मिळाली. काँग्रेसचे लियोन रायकर तिसऱ्या क्रमंकावर फेकले गेले त्यांना फक्त 1089 मते घेता आली.

आरजीच्या अँड्र्यू रिबेलो यांना 784 तर अपक्ष मुर्तूजा कुकनुर याना 560 मते मिळाली अन्य दोन अपक्षांनी किरकोळ मते घेतली. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा सांघिक विजय असे नाईक यांनी सांगितले. यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Goa Zilla Panchayat Election | Davorlim Constituency | Paresh Naik Wins
Goa Zilla Panchayat Election : दवर्ली, रेईस मागूशमध्ये भाजप; तर कुठ्ठाळीत अपक्षाची बाजी

दवर्ली मतदारसंघात रविवारी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत फक्त 50.52 टक्केच मतदान झाले होते. एकूण जे मतदान झाले आहे त्याचा आढावा घेतल्यास एकूण 5300 च्या आसपास हिंदू मतदान झाले असून साडेतीन हजार मुस्लीम मतदान झाले होते.

ख्रिश्चन मतदान फक्त दीड हजार मतापुरतेच सीमित राहिल्याने भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण होते. या मतदारसंघात पीएफआयच्या मुद्यामुळे मुस्लीम मतदारांनी भाजपच्या विरोधात एकगठ्ठा मते एकाच उमेदवाराला दिली, तर निकालात बदल घडू शकतो असा तर्क व्यक्त केला जात होता. मात्र अखेर भाजप उमेदवाराच्या गळ्यातच विजयाची माळ पडल्यामुळे या सर्व शक्यतांवर आता पूर्णविराम लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com