Vasco Krishna Salkar Dainik Gomantak
गोवा

वास्कोतील भाजपा उमेदवार कृष्णा साळकरांचा जाहीरनामा सादर

वास्को शहर बरेच मागे राहिले आहे, भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास केला जाईल; कृष्णा साळकर

दैनिक गोमन्तक

अत्याधुनिक सुविधांनी युक्त बसस्थानक, सुसज्ज मासळी मार्केट प्रकल्प, मॉर्डन मार्केट, मायमोळे, भुटेभाट मैदान, मायमोळे, सासमोळे लेक, युवकासाठी नोकऱ्या, पाण्याची व्यवस्था आदी तेरा कलमी जाहीरनामा वास्कोतील भाजपचे उमेदवार कृष्णा साळकर (krishna salkar) यांनी सादर केला.

यावेळी भाजपचे वास्को गटाध्यक्ष दीपक नाईक, राज्यकारणी सदस्य जयंत जाधव, नगरसेवक तथा युवा गटाध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेविका शमी साळकर, माजी उपनगराध्यक्ष लविना डिसोझा, माजी नगराध्यक्ष फियोला रेगो, महिला मोर्चा अध्यक्ष पूजा नाईक आदी उपस्थित होत्या.

जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना साळकर यांनी सांगितले की हा जाहीरनामा नमूद केलेले सर्व प्रकल्प येत्या पाच वर्षात या ठिकाणी राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षात हे प्रकल्प रखडत आहे, याला जबाबदार गेल्या दहा वर्षात या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे वास्को शहर बरेच मागे राहिले आहे. भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास केला जाईल असे साळकर शेवटी म्हणाले.

यावेळी वास्को (Vasco) भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक यांनी बोलताना या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व विकास प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास आणले जाईल. यात बस स्थानक तसेच मासळी मार्केट प्रकल्प हा मुख्य आहे. भाजपच्या (BJP) माध्यमातूनच हे प्रश्न सुटणार असल्याचे दीपक नाईक यांनी सांगितले व येणाऱ्या काळात वास्को शहराचा कायापालट होणार यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT