Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Margao Election: 15 चे 10 कसे झाले ? मुख्यमंत्री आश्चर्यचकित

न समजणाऱ्या गणिताने मुख्यमंत्री सावंत हे स्वतःच हैराण

Sumit Tambekar

मडगाव: नगराध्यक्ष निवडणूकीत भाजपच्याच नगराध्यक्षांनी भाजपला दगा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे 15 नगरसेवक असताना ही आज भाजप उमेदवारास 10 मते पडल्याने त्याचा पराभव झाला. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज बैठक बोलावली. यावेळी ही 15 नगरसेवक उपस्थित मग दामोदर शिरोडकर यांना 10 मते पडली कशी ?

(BJP candidate defeated in Margao mayor election The meeting held by CM Pramod Sawant)

या न समजणाऱ्या गणिताने मुख्यमंत्री सावंत हे स्वतःच हैराण झाले. विरोधी मत मारणारे पाच नगरसेवक कोण याबद्दल चर्चा चालूच होती. या बैठकीला मडगाव येथील आमदार दिगंबर कामत, तसेच मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे हेही हजर होते.

यासंबंधी कामत याना विचारले असता, या न समझणाऱ्या गणिताने मुख्यमंत्री स्वतः हैराण झाले असल्याचे ते म्हणाले. पालिका राजकारणात हे असे होतेच असेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनःश्याम यांच्यावर अविश्वास ठराव आणणार का ? असे विचारल्यावर अजून तसा निर्णय झालेला नाही. असा निर्णय घ्यायचा झाल्यास चर्चा करूनच घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

मंडळ अध्यक्ष रुपेश महात्मे याना विचारले असता, 'आमच्याच लोकांनी आमची मारली', असा त्याचा अर्थ होत असून ज्या कुणी ही गद्दारी केली त्यांनी त्यांना नको असल्यास दुसरीकडे जावे असे त्यांना सुचविण्यात आल्याचे सांगितले. यासंबधीची पुढील कृती काय असे विचारले असता, दोन दिवस आम्ही विश्रांती घेणार आहोत. पुढची कृती काय करायची ते आम्ही सोमवारी ठरवू असे ते म्हणाले.

हे पाच विरोधी मतदान करणारे नगरसेवक कोण? या बद्दल आज संपूर्ण दिवस तर्क वितर्क चालू होते. या पाच जणात दिगंबर कामत यांच्या गटातील दोन तर भाजप गटातील तीन नगरसेवक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दामोदर शिरोडकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या बरोबर रहाणार नाही असे काही भाजप नगरसेवकांनी पूर्वीच सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक आहे का? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT