bits pilani student death Dainik Gomantak
गोवा

Bits Pilani: गूढ उलगडले! 'बिट्स पिलानी'तील 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू ड्रग्जमुळे नाही; फॉरेन्सिक अहवालामुळे नवा प्रश्न उपस्थित

Bits Pilani Student Death: १७ ऑगस्ट रोजी बिट्स पिलानी कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये झोपलेल्या अवस्थेत कुशाग्रचा मृत्यू झाला होता. मात्र, हा प्रकार आत्महत्येचा नसल्याचे त्यावेळी दिसून आले होते.

Sameer Panditrao

मडगाव: सांखवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये १५ दिवसांपूर्वी कुशाग्र जैन या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू हा अमली पदार्थांच्या सेवनामुळे नव्हे, तर उच्च रक्तदाबाच्या विकारावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या गोळ्यांचा वापर केला जातो त्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

१७ ऑगस्ट रोजी बिट्स पिलानी कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये झोपलेल्या अवस्थेत कुशाग्रचा मृत्यू झाला होता. मात्र, हा प्रकार आत्महत्येचा नसल्याचे त्यावेळी दिसून आले होते.

कुशाग्रचा मृत्यू झाला, त्यादिवशी तो दुपारी २.१२ पर्यंत व्हॉट्स ॲपवर ऍक्टिव्ह होता. नंतर त्याने टेबल टेनिस खेळले आणि नंतर तो हॉस्टेलवरील रूमवर गेला होता.

हा मृत्यू अमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला नसल्याचे जरी स्पष्ट झाले असले तरी २१ वर्षांचा हा युवक उच्च रक्तदाबाच्या गोळ्यांचे सेवन का करत होता, हा नवा गूढ प्रश्न या अहवालामुळे निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया चषकात भारतीय संघाचा दबदबा! कझाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजून साधली 'हॅटट्रिक'

Mapusa Nirmalya Kalash: म्हापसा येथे 'निर्मल्या कलश' ठरला गेम चेंजर; गणेशोत्सवात घालून दिला पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श!

Acidity: पोटातली जळजळ धोकादायक! अ‍ॅसिडिटीमुळे होऊ शकतात 'हे' 5 गंभीर आजार, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

पार्टीत ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न... प्रियाच्या जाण्याने प्रेमकथा अपूर्ण; 'ती' पोस्ट होतेय Viral

SCROLL FOR NEXT