BITS Pilani, Goa Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani Goa Campus: गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पस सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार खुला, ज्ञानाचा खजिना अनुभवता येणार

20 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्था वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे.

Pramod Yadav

BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसची 20 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गोव्यातील शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना BITS पिलानी कॅम्पस खुला केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना येथील सुविधांचा अनुभव घेण्यासह आणि संशोधन प्रकल्प पाहता येणार आहेत.

20 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्था वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 या काळात यात सहभागी होता येईल.

6 नोव्हेंबर, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत, BITS कॅम्पस राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले जाणार आहे. तर, संस्थेच्या वतीने जानेवारी 2024 मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांचे जाहीर व्याख्यान सर्वांना ऐकता येणार आहे.

सर्व प्रयोगशाळा आणि उच्चस्तरीय संशोधन केंद्रे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली असतील. आमचे प्रोटोटाइप आणि इतर विज्ञान, अर्थशास्त्र आणि साहित्य प्रकल्प पाहण्यासाठी प्रदर्शित केले जातील.

या काळात दोन सार्वजनिक व्याख्याने देखील आयोजित केली जातील, ज्यात गोवाचे आर्किटेक्ट डीन डिक्रूझ आणि BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पस संचालक, प्राध्यापक सुमन कुंडू यांची व्याख्याने असतील.

कॅम्पसमधील 2,200 प्रेक्षक क्षमता असलेल्या सभागृहात सार्वजनिक व्याख्याने होणार आहेत. यापैकी पहिले व्याख्यान 1 नोव्हेंबर रोजी देशातील सर्वात प्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत मूर्ती यांचे होईल.

यानंतर, 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर पोलर आणि ओशन रिसर्च (NCPOR) आणि इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, बेंगळुरू सोबत बैठक आयोजित करणार आहोत, अशी माहिती BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पस डायरेक्टर, प्रोफेसर सुमन कुंडू यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या बैठकीत गोवा विद्यापीठ आणि राज्यभरातील महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी विज्ञान कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT