Ruturaj Godse Dainik Gomantak
गोवा

महिन्याला 5 लाखांपेक्षा जास्त पगार, BITS पिलानी गोवा कॅम्पसच्या विद्यार्थ्याला मिळाले छप्परफाड पॅकेज

BITS Pilani K K Birla Goa Campus: Computer Science चे शिक्षण घेणाऱ्य ऋतुराज गोडसे या विद्यार्थ्याला वार्षिक ६० लाख ८० हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

Pramod Yadav

BITS Pilani K K Birla Goa Campus

वास्को: गोव्यात असलेल्या BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसमधील एका विद्यार्थ्याला प्लेसमेंटमध्ये रेकॉर्डब्रेक पॅकेज मिळाले आहे. Computer Science चे शिक्षण घेणाऱ्य ऋतुराज गोडसे या विद्यार्थ्याला वार्षिक ६० लाख ८० हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. देशांतर्गत मिळणाऱ्या ऑफरच्या तुलनेत पॅकेजमध्ये 35 टक्के वाढ झाल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ऋतुराज गोडसे या विद्यार्थ्याला बहुराष्ट्रीय गुंतवणूक कंपनी डी. ई. शॉ या कंपनीकडून हे पॅकेज मिळाले आहे. वार्षिक पॅकेजनुसार, ऋतुराजला महिन्याला पाच लाख सहा हजार एवढा पगार मिळणार आहे. BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पस मधील नोंदणी केलेल्या ९० टक्के विद्यार्थ्यांना यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळाली आहे. यावर्षी ९२६ विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती.

प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 79 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वार्षिक 40 लाख रुपयांपेक्षा जास्त पगाराचे पॅकेज मिळाले आहे. ही संख्या कॅम्पससाठी आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. वर्षाला ४० लाख रुपये पगार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत दुप्पट आहे.
जी बालसुब्रमण्यन, मुख्य प्लेसमेंट अधिकारी, BITS पिलानी, भारत आणि दुबई

देशांतर्गत मिळणाऱ्या पॅकेजमध्ये ३५ टक्के वाढ झाली असून, तर सरासरी पगारात देखील जवळपास ९.४ टक्के वाढ झाली आहे. पगारात १९.२ लाख रुपयांवरून २०.९ लाख एवढी वाढ झाली आहे.

BITS पिलानीच्या गोवा कॅम्पसमध्ये २८० कंपन्यांनी भेट दिली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात चार टक्के वाढ झाल्याचे बालसुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.

समर इंटर्नशिप प्री-प्लेसमेंट ऑफर दरम्यान गोवा कॅम्पसमध्ये प्लेसमेंटचा हंगाम सुरू झाला. यावेळी ६० टक्क्यांपेक्षा जास्त इंटर्नला पूर्ण-वेळ नोकरीची ऑफर मिळाली. विद्यार्थ्यांना Google, Microsoft, Uber, D E Shaw, Texas Instruments, Nvidia आणि Exxon Mobil यांसारख्या कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या आहेत.
आर बी मौली - गोवा कॅम्पस प्लेसमेंट हेड

जागतिक दर्जाच्या टेक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना मोठ्या ऑफर मिळाल्या, ॲमेझॉनने 32 विद्यार्थ्यांना, उबेरने 16, मायक्रोसॉफ्टने 17, नुटानिक्सला 13 आणि गुगलने 7 विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT