Goa BITS Student Death:  बिट्समधील हा विद्यार्थी कम्प्युटर सायन्समध्ये बीइ तर फिजिक्समध्ये एमएससी करत होता
BITS Pilani GoaDainik Gomantak

BITS पिलानी गोवा कॅम्पसच्या वसतिगृहात आढळला गाझियाबादच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट

Goa BITS Student Death: बिट्समधील हा विद्यार्थी कम्प्युटर सायन्समध्ये बीइ तर फिजिक्समध्ये एमएससी करत होता
Published on

वास्को: गोव्यातील बिट्स पिलानी या प्रसिद्ध कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली. २० वर्षीय मुलगा मृत अवस्थेत सापडल्याने कॉलेजमध्ये बरीच खबल उडाली होती. मंगळवारी (दि. १० डिसेंबर) रोजी उघडकीस आलेली ही घटना पोलिसांच्या मते आत्महत्येचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. बिट्समधील हा विद्यार्थी कम्प्युटर सायन्समध्ये बीइ तर फिजिक्समध्ये एमएससी करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी या मृत तरुणाची परीक्षा होती मात्र तो काही परीक्षेला उपस्थित न राहिल्याने काही मित्र त्याच्या खोलीत तपासायला आले, दरम्यान त्यांना खोलीचं दार आतून बंद आढळलं आणि अनेकवेळा प्रयत्न करून देखील कोणीही दरवाजा उघडला नाही.

Goa BITS Student Death:  बिट्समधील हा विद्यार्थी कम्प्युटर सायन्समध्ये बीइ तर फिजिक्समध्ये एमएससी करत होता
वय वर्ष 22, BITS गोवा ड्रॉपआऊट; कमाई.. महिना 35 लाख रुपये; अशनीर ग्रोव्हरही झाला Impress

हे प्रकरण काहीसं संशयास्पद वाटल्याने नंतर गोवा पोलिसांशी संपर्क करण्यात आला. संध्याकाळी ५:५१ च्या सुमारास एकूण प्रकरण पोलिसांच्या नजरेस आलं मात्र इथे आत्महत्येचं कारण सांगणारी कुठलीही चिट्ठी अगर पत्र पोलिसांच्या हाती लागलेलं नाही.

मयत तरुणाचे आई-वडील दिल्लीत राहतात आणि त्यांना देखील पोलिसांनी गोव्यात हजर होण्याची सूचना दिली होती. २० वर्षीय मुलाच्या या संशयास्पद निधनावर कॉलेजच्या व्यवस्थापनाने हळहळ व्यक्त केली, आणि एवढ्या कमी वयात जीव गमावलेल्या एका हुशार विद्यार्थ्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडणं खूप धक्कादायक आहे असे मत व्यक्त केले. या घटनेच्या संपूर्ण तपासात कॉलेज पोलिसांची सर्वतोपरी मदत करेल तसेच मयताच्या पालकांसोबत देखील कॉलेज आहे असे दिलासादायक वाधीन व्यवस्थापनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com