BITS Pilani Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: परीक्षेच्या तोंडावर 3 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन, 'बिट्स पिलानी' प्रकरणी राज्यपाल पिल्लईंनी मागितला अहवाल

BITS Pilani Students Death: बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये गेल्या पाच सहा महिन्यांत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

Sameer Panditrao

वास्को: झुआरीनगर-सांकवाळ येथील बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमधील तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची दखल गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणांवर सविस्तर अहवाल मागितला आहे.

बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये गेल्या पाच सहा महिन्यांत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी दखल घेताना बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या व्यवस्थापनाने काही पाऊले उचलली आहेत.

जे विद्यार्थी तणावाखाली असतील त्यांना परीक्षा नंतर देण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी विषयक इतर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

आता राज्यपालानी या प्रकरणी लक्ष घातल्याने या प्रकरणातील गंभीरता वाढली आहे. राज्यपालांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांनी धक्का बसला आहे.

या आत्महत्या कोणत्या कारणासाठी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत यासंबंधी कारणे शोधा तसेच असे प्रकार भविष्यात होऊ नयेत यासाठी संस्थेने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने काही ठोस िनयोजन करण्यात आले आहे की नाही याचा सविस्तर अहवाल बिट्स पिलानीच्या व्यवस्थापनाकडून मागवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

SCROLL FOR NEXT