Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: सहावा बळी! "आता आश्वासनं नको, न्यायालयीन चौकशी हवी", बिट्स पिलानीतील मृत्यूच्या सत्रावरून पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल

BITS Pilani Goa: गोव्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था 'बिट्स पिलानी'च्या कॅम्पसमध्ये आज सकाळी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था 'बिट्स पिलानी' (BITS Pilani) च्या कॅम्पसमध्ये आज सकाळी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी राज्य सरकार आणि संस्था प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.

६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमित पाटकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि बिट्स पिलानी व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. त्यांच्या मते, अवघ्या वर्षभरात ही सहावी घटना आहे. "प्रत्येक मृत्यू ही टाळता येण्यासारखी शोकांतिका होती, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तरुण जीव जात आहेत," असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी सुरक्षा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न

पाटकरांनी पोस्टमध्ये काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा का नाही? नामांकित संस्था असूनही विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी दिले जाणारे समर्थन अपुरे आणि कुचकामी का आहे? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.

स्वतंत्र न्यायालयीन चौकशीची मागणी

"आम्हाला आता केवळ आश्वासनं नकोत, तर या सर्व प्रकरणांची निष्पक्ष आणि स्वतंत्र 'न्यायालयीन चौकशी' (Judicial Inquiry) हवी आहे," अशी मागणी पाटकरांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे हे सत्र थांबवण्यासाठी आणि या मृत्यूंना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची प्रतीक्षा

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उच्च शिक्षणासाठी येणारी मुले अशा प्रकारे टोकाचे पाऊल का उचलत आहेत, याचा शोध घेण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT