Goa Crime: गोवा हादरला! 'बिट्स पिलानी'त 20 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन, पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Bits Pilani Student Death: शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था मानल्या जाणाऱ्या 'बिट्स पिलानी' (BITS Pilani) च्या कॅम्पसमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था मानल्या जाणाऱ्या 'बिट्स पिलानी' (BITS Pilani) च्या कॅम्पसमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेत जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी मूळची कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील होती. ती या प्रतिष्ठित संस्थेत आपले उच्च शिक्षण पूर्ण करत होती. सोमवारी ही विद्यार्थिनी आपल्या खोलीतून बराच वेळ बाहेर न आल्याने आणि तिच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. त्यानंतर खोलीचे दार उघडले असता, ती बेडशीटच्या साहाय्याने छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

Goa Crime
Goa BJP: भाजपने कंबर कसली, विरोधी पक्षांचे अजून ठरेना; गोवा विधानसभा निवडणूकीचे बिगुल

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद केली असून सखोल चौकशी सुरू केली आहे.

मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढते नैराश्य आणि मानसिक दडपण हा विषय या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिट्स पिलानी सारख्या नामांकित संस्थेत प्रवेश मिळवूनही अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण असू शकते, याचा शोध पोलीस घेत आहेत. कौटुंबिक समस्या, अभ्यासाचा ताण की अन्य काही वैयक्तिक कारण, या सर्व बाजूंनी तपास चक्रावली जात आहे.

Goa Crime
Recyclable Waste Scheme Goa: रिकाम्या बाटल्या द्या, पैसे घ्या! सरकारचा हरित उपक्रम; ‘गोवा डिपॉझिट रिफंड स्कीम’ एक एप्रिलपासून

या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये सध्या शांतता पसरली असून, पोलिसांनी विद्यार्थ्यांकडे देखील प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com