BITS Pilani 
गोवा

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

BITS Pilani Student Death: बिट्स पिलानी गोवा कॅम्पसवर घडलेल्या विद्यार्थ्यांच्या सलग मृत्यूंची राज्य सरकारकडून सखोल चौकशी करावी.

Sameer Amunekar

पणजी: बिट्स पिलानी गोवा कॅम्पसवर घडलेल्या विद्यार्थ्यांच्या सलग मृत्यूंची राज्य सरकारकडून सखोल चौकशी करावी, त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन मृत्यूंच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग नेमावा, अशी मागणी महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केली.

काँग्रेस भवनात शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपाध्यक्षा सई वळवईकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षा ममता माबेन व कुठ्ठाळी ब्लॉक अध्यक्ष लता नाईक उपस्थित होत्या.

खलप म्हणाल्या, बिट्स पिलानी या प्रख्यात संस्थेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूची नऊ महिन्यांत पाचव्या घडलेल्या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या संस्थेतच का घडत आहे? अजूनही चौकशी सुरू आहे, असे सरकार सांगते, सरकार नेमके काय करतेय?

चौकशी आयोग नेमा

गोवा खंडपीठाने न्यायालयीन आयोग नेमून चौकशीचे आदेश द्यावेत, असे खलप म्हणाल्या. याशिवाय राज्यात घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांची आकडेवारीही त्यांनी सांगितली.

त्या म्हणाल्या, २०२१ मध्ये २१२, २०२२ मध्ये ३०४ आणि २०२३ मध्ये ३२९ आत्महत्या झाल्या आहेत. यावरून दरवर्षी हा आकडा वाढतो आहे. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

Ronaldo Goa Visit: 'रोनाल्डो' गोवा दौऱ्यावर येणार का? माहिती अजूनही गुप्त; आगमनाबाबत साशंकता

Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT