Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Drug Case: गुन्हे शाखेच्या पथकाने शिवोली येथील मारना भागात छापा टाकून नायजेरियन नागरिकाला अटक केली.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुन्हे शाखेच्या पथकाने शिवोली येथील मारना भागात छापा टाकून नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ४२.३७२ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केला आहे.

याचे बाजारमूल्य ८,५०,००० असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित भाड्याच्या खोलीत राहत असून नायजेरियन नागरिक एझियाशी आयकेचुक्वू कॅलिस्टस (वय ३८) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिस निरीक्षक मंगेश वळवईकर, प्रशाल देसाई व लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, पोलिस उपनिरीक्षक अमिन नाईक, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रगती मळीक, एएसआय श्रीराम साळगावकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील सिमेपुरुषकर आणि आदर्श गावस यांच्या सहकार्याने काल ही कारवाई केली.

Goa Drug Case
Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

या छाप्यात पोलिसांनी ४.४८५ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन, २.२९४ ग्रॅम एमडीएमए, ३५.५९३ ग्रॅम कोकेन असा एकूण ४२.३७२ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केला. अटक केलेल्या आरोपीचे नाव एझियाशी आयकेचुक्वू कॅलिस्टस असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Goa Drug Case
Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमिन नाईक हे पोलिस उपअधीक्षक (क्राईम) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com