Bits Pilani Rishi Nair Dainik Gomantak
गोवा

Bits Pilani: गोव्यातील बिट्सचे विद्यार्थीच 'का' तणावाखाली येतात? 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणावरून आपचा सवाल

Bits Pilani Student Death: ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी आमदार क्रूझ सिल्वा आणि पक्षाचे संघटन सचिव प्रशांत नाईक यांनी एग्ना क्लिटस यांची भेट घेऊन चर्चा केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bits Pilani Case : भारतात बिट्स पिलानीचे एकूण पाच कॅम्पस आहेत. मात्र त्यापैकी गोव्यातील कॅम्पसमध्येच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या का होतात, असा सवाल आम आदमी पार्टीने केला असून दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी या संदर्भात सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी आमदार क्रूझ सिल्वा आणि पक्षाचे संघटन सचिव प्रशांत नाईक यांनी एग्ना क्लिटस यांची भेट घेऊन चर्चा केली. मागच्या सप्टेंबर महिन्यात याच कॅम्पस मध्ये पाचव्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर गोवा सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशीचे काय झाले, याचीही माहिती त्यांनी घेतली.

यावेळी माध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले, १३ महिन्यात बिट्समध्ये ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. फक्त गोव्यातच हे मृत्यू होत आहेत. बिट्सच्या सर्व ठिकाणी एकच सिलॅबस असतो मग गोव्यात शिकणारे विद्यार्थीच का तणावाखाली येतात, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही जिल्हाधिकारी चौकशी करतात, एवढे सांगून आपल्यावरची जबाबदारी टाळू नये, असेही ते म्हणाले.

पाचव्या मृत्यूनंतर जी चौकशी सुरू केली होती ती अंतिम टप्प्यात असून काही अहवाल आमच्याकडे यायचे बाकी आहेत. ते आल्यावर लगेच आमचा चौकशी अहवाल सरकारला सादर करू.

-एग्ना क्लिटस, जिल्हाधिकारी दक्षिण गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT