Bits Pilani Student Death: 4 महिने चौकशी रखडलेलीच! बिट्स पिलानी ऋषी नायर मृत्यू प्रकरण; फॉरेन्सिक रिपोर्ट प्रलंबित

Bits Pilani Rishi Nair: गत सप्टेंबरमध्ये याच कॅम्पस मध्ये ऋषी नायर या विद्यार्थ्याला मृत्यू आल्यानंतर सरकारने जिल्हाधिकारी स्तरावर एक चौकशी समिती नेमली होती.
Bits Pilani Rishi Nair
Bits Pilani Rishi NairDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सांखवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये सहाव्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने ही शैक्षणिक संस्था पुन्हा चर्चेत आलेली असताना गत सप्टेंबरमध्ये याच कॅम्पस मध्ये ऋषी नायर या विद्यार्थ्याला मृत्यू आल्यानंतर सरकारने जिल्हाधिकारी स्तरावर एक चौकशी समिती नेमली होती.

या घटनेला चार महिने उलटले तरी या चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप सरकारला सादर केलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी क्लिटस म्हणाल्या, की या प्रकरणी आमच्या समितीने प्रथमदर्शनी अहवाल सरकारला सादर केला.

Bits Pilani Rishi Nair
BITS Pilani: 'बिट्‌स पिलानी' बिर्लाची संस्‍था असल्‍यामुळेच सरकारचे गैरकृत्‍यांकडे दुर्लक्ष, तज्‍ज्ञ समितीतर्फे चौकशी करा; 'आप'ची मागणी

मात्र फॉरेन्सिक रिपोर्ट न आल्याने ही चौकशी अद्याप रखडली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांची जबानी कुणीच नोंदवून घेतलेली नाही, हेही स्पष्ट झाले आहे. डॉ. घोडकिरेकर यांनी हे मृत्यू कोणत्या स्थितीत झाले असावेत ही माहिती मिळविण्याचाही प्रयत्न केला होता.

Bits Pilani Rishi Nair
Bits Pilani: 'ती' विद्यार्थिनी होती डिप्रेशनमध्ये? ‘बिट्स पिलानी’ मध्ये 14 महिन्‍यांत 6 जणांचा मृत्यू; न्‍यायालयीन चौकशीची होतेय मागणी

त्यांनी मृतांचे नातेवाईक, बिट्स मधील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली होती. परंतु, त्यांची जबानी घ्यावी, असे या चौकशी समितीला का वाटले नाही, या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com