Bison | File Photo Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News: साखळीत गव्यांचा धुमाकूळ; पाच तास उच्छाद

प्राणीमित्र, वन कर्मचारी, ग्रामस्थांनी पिटाळले

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanquelim News: साखळी शहरात दोन गवे भर लोकवस्तीत शिरण्याचा प्रकार आज (शुक्रवारी) सकाळी घडला. साखळीतील देसाईनगर भागात हे गवे घुसले. गवे भरवस्तीत घुसल्याने लोकांमध्ये एकूच खळबळ आणि गोंधळ उडाला.

तर गवेही काहीसे बिथरले. अखेर प्राणीमित्र, वन खाते आणि स्थानिकांच्या अथक परिश्रमानंतर गव्यांना पिटाळून लावण्यात यश आले.

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन देसाईनगर-साखळी भागात शिरले. गवे लोकवस्तीत घुसल्याने त्या भागातील लोकांमध्ये गोंधळ तेवढीच घबराट पसरली. हे गवे कोठून आले, त्याची माहिती मिळू शकली नसली, खाद्याच्या शोधात हे गवे चुकून साखळी शहरात घुसले. असा अंदाज आहे.

गवे लोकवस्तीत घुसल्याची माहिती मिळताच ऍनिमल रेस्क्यू स्कॉडचे कार्यकर्ते नंतर वन खात्याचे पथक देसाईनगरात दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने गव्यांना पिटाळून लावण्याची मोहीम हाती घेतली. मात्र गव्यांनी सर्वांना जेरीस आणले. अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर गव्यांनी रानाच्या दिशेने धूम ठोकली.

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. जंगले बोडकी होऊ लागली आहेत. त्यामुळे वन्यप्राणी भक्ष्य किंवा खाद्य शोधण्यासाठी लोकवस्तीत घुसत आहेत. जंगले वाचली नाहीत, तर भविष्यात भयानक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अमृत सिंग, प्राणीमित्र.

वाळपई ‘नवोदय’परिसरातही गवे

जवाहर नवोदय विद्यालय रस्त्यावर आज दुपारी गव्यांनी उच्छाद मांडला. त्यामुळे विद्यालयाच्या परिसरात भीत्तीचे वातावरण पसरले आहे. शाळेत एकूण 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

या विद्यालयाच्या परिसरात रानटी जनावरांचा संचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकामध्ये भीतीचे वातावरण आहे. रानटी जनावरे थेट विद्यालय परिसरात जात आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT