गोवा

Liquor In Goa: बनावट दारू प्रकरणी बिष्णोई हाती लागेना

Liquor In Goa: गुजरात पोलिस राजस्थानला: तिथूनही तो बेपत्ता

दैनिक गोमन्तक

Liquor In Goa:

गुजरातेत नवसारी येथे पकडलेल्या गोव्यात निर्मित बनावट दारू प्रकरणाचा तपास त्या प्रकरणातील मुख्य संशयित मानला जाणारा सुरेश बिष्णोई न सापडल्याने रेंगाळला आहे. राजस्थानमध्ये बिष्णोईच्या शोधात गुजरात पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक गेले असून तो तेथून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

गुजरात पोलिसांनी गोव्यातून या प्रकरणात अटक केलेल्या मायकल डिसोझा व मनीष मिश्रा यांचा पोलिस कोठडीचा रिमांड उद्या संपत आहे. डिसोझा याने पकडण्यात आलेल्या ५०.४० लाख रुपयांच्या दारुची विक्री केली तर भलत्याच ब्रॅण्डच्या नावाने मिश्रा याने आपल्या कंपनीत दारुची निर्मिती केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या तपासणीत एका ट्रकमध्ये ही दारू सापडली होती. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालक फारुकखान मोयला याला अटक केली.

या ट्रकाला मार्गदर्शन करणाऱ्या वाहनाचा चालक विक्रमकुमार भिल यालाही पोलिसांनी पकडले. त्यानी ही दारू गोव्यातून आणल्याची माहिती दिल्यावरून गुजरात पोलिस गोव्यात आले. त्यांनी तपासकामा दरम्यान दारुची विक्री केल्याच्य संशयावरून डिसोझा याला तर दारू निर्मितीचा संशय असलेल्या कंपनीचा मालक मिश्रा याला पकडले.

बनावट कागदपत्रे बनवणाऱ्याचाही शोध

या दारूची वाहतूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे कोणी तयार केली याचाही तपास गुजरात पोलिस करत आहेत.दारू निर्मिती कंपनीत नियुक्त असलेल्या अबकारी निरीक्षकाने कोणत्या प्रकारच्या दारूचे उत्पादन झाले याचे प्रमाणपत्र दिले होते, याचीही चौकशी हे पोलिस करत आहेत. सुरवातीला यावरच त्यांचा भर होता मात्र बिष्णोई न सापडल्याने तूर्त त्यांनी राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT