Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: बर्च अग्नितांडव प्रकरणी 15 अधिकाऱ्यांवर ‘बडगा’! सरपंच, पंचायत सचिवांवरही टांगती तलवार

Arpora Nightclub Fire: : बर्च बाय रोमिओ लेन क्लबला बेकायदेशीरपणे परवाने देण्यात गुंतलेल्या १५ अधिकाऱ्यांवर विविध खातेप्रमुख उद्यापासून कारवाई करणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बर्च बाय रोमिओ लेन क्लबला बेकायदेशीरपणे परवाने देण्यात गुंतलेल्या १५ अधिकाऱ्यांवर विविध खातेप्रमुख उद्यापासून कारवाई करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर व्ही. कंदवेलू यांनी ही बैठक झाल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले, की न्यायदंडाधिकारी अहवालावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि संबंधितांवर खातेप्रमुखांनी कारवाई करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी खातेवार दिलेल्या या अहवालावर खातेप्रमुख कोणती कारवाई करणार आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जाणून घेतली.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखालील न्यायदंडाधिकारी समितीने हा अहवाल तयार केला आहे. त्रुटीपूर्ण परिस्थितीत परवाने देण्यात कोणते अधिकारी गुंतले होते आणि तसे परवाने देण्यासाठी कोणी शिफारस केली होती, याविषयीचे सविस्तर आकलन अहवालात मांडण्यात आले आहे. कारवाईस पात्र अशा अधिकाऱ्यांची थेट नावेच अहवालात नोंदविण्यात आली आहेत.

संबंधित खातेप्रमुखांना बैठकीत त्यांच्याशी संबंधित अहवालाचा अंश लिखित स्वरूपात देण्यात आला आहे. त्याच्या आधारे त्यांनी आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांवर कारवाई करणे सरकारला अपेक्षित आहे.

विधानसभेच्या येत्या अधिवेशनापूर्वी सर्वांवर कारवाई करण्याचा सरकारचा मानस आहे.

मुख्यमंत्र्यांनी या बोलावलेल्या बैठकीआधी मुख्य सचिवांनी सचिवालयातील आपल्या परिषद सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अहवालात नोंद अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कोणती पूर्वतयारी केली आहे, याची माहिती घेतली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सगळे अधिकारी आले आणि बैठकीत सहभागी झाले.

आम्हाला न्याय द्या; नातेवाईकांचा टाहो

या दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांनी गोव्यात दाखल होत ‘आम्हाला न्याय द्या!’ अशी मागणी केली. या प्रकरणातील संशयित लुथरा बंधूंनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यांना जामीन मिळू नये, यासाठी त्यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.

यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अटळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मधल्या फळीतील दोन अधिकारी, अन्न व औषध प्रशासन खात्याचे अधिकारी, अबकारी खात्याचे दोन अधिकारी, अग्निशमन दलाचे दोन अधिकारी, पंचायत खात्याचे दोन अधिकारी आदींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

सरपंच, पंचायत सचिवांवरही टांगती तलवार

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिलेल्या या अहवालात हडफड्याचे सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सरकार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहे. अहवालात नावे आलेल्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तरतुदीनुसार कारवाई होणार आहे.

- डॉ. व्ही. कंदवेलू, मुख्य सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclubs: 25 जणांच्या मृत्यूचे सावट, तरीही सील केलेले नाईट क्लब पुन्हा सुरू; दोन आठवड्यांत परवाने कसे मिळाले?

Bicholim River Front: ‘रिव्हर फ्रंट’चे सौंदर्यीकरण हरवतेय! डिचोलीत अस्तित्वासाठी संघर्ष; देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Siolim Jagor Jatra: "सगळे देवू एकूच..."! मध्यरात्री सगळे ‘दांडो’ वाड्यावरील जागरेश्वराच्या दिशेने वळतात; शिवोलीचा जागोर

Goa Live News: सांडपाण्यामुळे खारफुटीचा ऱ्हास; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर गंभीर आरोप

अग्रलेख: ‘गोंय गोंयकारांचे उरूंक ना’ हेसुद्धा दिल्लीवाल्या हिंदीत सांगावे लागेल! सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना..

SCROLL FOR NEXT