Bipasha Basu In Goa Dainik Gomantak
गोवा

Bipasha Basu In Goa: गोव्याच्या किनाऱ्यावर बिपाशा-करणचे रोमँटिक सेलिब्रेशन, मुलगी देवीसोबत केला डान्स, पाहा VIDEO

Bipasha Basu Goa Instagram Post: अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सध्या मुलगी देवी हिच्यासह गोव्यातील शांत, निसर्गरम्य वातावरणात खास क्षण घालवत आहेत.

Sameer Amunekar

पणजी: अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सध्या मुलगी देवीसोबत गोव्यातील शांत, निसर्गरम्य वातावरणात खास क्षण घालवत आहेत. ३० एप्रिल २०१६ रोजी विवाहबंधनात अडकलेलं हे कपल यंदा त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहे. हा खास दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी हे जोडपं गोवा फिरायला गेलंय.

बिपाशा बसू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. आज तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा नवरा करण सिंग ग्रोव्हर आणि त्यांची मुलगी देवी एका नाचताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये बिपाशा, करण आणि देवी यांचे गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये पारंपरिक पद्धतीने फुलांनी स्वागत होत असल्याचंही दिसतं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे कुटुंब नाचताना दिसत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर हार्ट आणि स्माईल इमोजींचा वर्षाव केला आहे. काहींनी तर 'परफेक्ट फॅमिली' अशी कमेंटही केली आहे.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण ते नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

बिपाशा बसू ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे जिने हिंदी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे आपली छाप उमटवली आहे. अजनबी, राज, जिस्म, नो एंट्री, धूम 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं महत्तवाची भूमिका बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT