Goa Crime: गोव्यात मटका अड्ड्यांविरुद्ध मोठी कारवाई, विविध ठिकाणी 12 बुकींना अटक; रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

Goa Matka Gambling: पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेल्या रोख रकमेची आणि जुगार साहित्याची अचूक माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मटक्यावर मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी कारवाई करत गुन्हे शाखेने पणजी, म्हापसा, पर्वरी, मडगाव, वास्को, फोंडा, मांद्रे आणि पेडणे येथे छापे टाकून १२ गुन्हे नोंदवले आहेत. तितक्याच संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी प्रथम माहिती अहवालात (एफआयआरमध्ये) प्रमुख मटकाचालक म्हणून चंदुभाई ठक्कर उर्फ डिसा आणि घन:श्यामभाई (दोघेही अहमदाबाद येथील) तसेच जया चड्डा (मुंबई) यांची नावे नमूद आहेत.

GFA President Urges CM to Act on Housie Mafia
GFA president Cayetan FernandesDainik Gomantak

अटक केलेल्यांमध्ये रामचंद्र बिंद (वास्को), बाळप्पा तलवार (फातोर्डा), अली शेख (रेईस मागूश), कर्मराज कुमार (मांद्रे) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेल्या रोख रकमेची आणि जुगार साहित्याची अचूक माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Crime News
Goa Housie Ban: बंदी असतानाही 13 लाखांची हाऊजी! म्युझिकल शोच्या नावाखाली वार्का येथील प्रकार; कोलवा पोलिसांकडून गुन्हा नोंद

रोख रक्कम, साहित्य जप्त

पोलिसांनी या कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. अटकेतील बुकी आणि त्यांच्या कथित साहाय्यकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अण्णा, परेश, सुभाष, नीलेश, मौसिन, गुलजार, अप्पू तिवारी, नारायण परब, सोमनाथ, भरत, रमेश आणि अमरेश यांच्यावर गोवा सार्वजनिक जुगार कायदा आणि बीएनएस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Crime News
Satara Crime: साताऱ्यात गोवा बनावटीची 85 लाखांची दारु जप्त; सांगली, साताऱ्यातील दोघांना अटक

कारवाई कुठे

पणजी - म्हापसा

पर्वरी - मडगाव

वास्को - फोंडा

मांद्रे - पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com