आखिल भारतीय मराठा जागृती मंचतर्फे कुठ्ठाळी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती समारोहात ते प्रमुख वक्ते शिवाजी भुकेले शिवाजी महाराजांच्या तसबीरीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना.बाजूस इतर. Dainik Gomantak
गोवा

शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र हा चिंतनाचा विषय

आखिल भारतीय मराठा जागृती मंचतर्फे कुठ्ठाळी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती समारोहात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

दैनिक गोमन्तक

वास्को: शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र हा चिंतनाचा विषय आहे.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 240 मूठभर मावळ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.मावळखोऱ्यातील अठरापगड जातीतील सळसळत्या रक्ताच्या मावळ्यांना त्यांनी एकत्र आणले. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यायी स्फुल्लिंग निर्माण केले. असे उद्गार कोल्हापूर येथील इतिहासप्रेमी शिवाजी भुकेले यांनी काढले. (biography of Shivaji Maharaj is a matter of contemplation)

आखिल भारतीय मराठा जागृती मंचतर्फे कुठ्ठाळी (Cortalim) येथे आयोजित केलेल्या शिवजयंती समारोहात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बोगमाळो पंचायतचे उपसरपंच संकल्प महाले, अ. भा. मराठा मंचचे गोवा शाखेचे अध्यक्ष नागराज वाबळे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाटील, कुठ्ठाळी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्षा सरिता हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संकल्प महाले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati Shivaji Maharaj) यांनी गोव्यावरील (Goa) पोर्तुगीजांचे आक्रमण थोपवून ठेवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हे रयतेचे आहे. सर्वसामान्य प्रजेचे आहे. त्यांनी सर्व धर्मियांना समान वागणूक व न्याय दिला. सर्वधर्मसमभाष ही त्यांची निती होती.

सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कमडेश्वर महिला कला संघाने स्वागत - गीत व बाल शिवाजी यांच्यावर आधारित पोवाडा सादर केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवाजी भुकेले यांचा नारळ, श्रीफ,शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून संघाचे खजिनदार भारत पाटील यांनी सन्मान केला. तर शिवभक्त पुरस्कार प्रमोद मगर यांना देण्यात आला. तर उद्योजक 'पुरस्कार सचिन सावंत, अभिलाष चवरे, विशाल शिंदे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव बळवंत पाटील यांनी केले. तर हनुमान पवार यांनी आभार मानले. यव प्रसी नामदेव शिंदे, महेश चौघुले, राजाराम गावडे, प्रदीप गावडे, अमोल कदम, जगदीशराव जाधव, महेश रेडकर, विनेबा कुडेकर, श्रीकांत गावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT