गोवा: गोव्यातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुरक्षितपणे गोव्यात परत आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी एनआरआय आयुक्त सवाईकर यांनी विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांच्याकडे केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे गोव्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नागरिकांची जबाबदारी आपली असुन, त्यांना लवकरात लवकर राज्यात परत आणणे गरजेचे आहे. (Sawaikar's demand for safe repatriation of Goan nationals stranded in Ukraine)
युक्रेन (Ukraine) आणि रशियाच्या सीमेवरील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गंभीर परिस्थिती पाहता, एअर इंडियाच्या (Air India) पहिल्या विमानाने मंगळवारी रात्री 242 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यात आले. मायदेशी परतलेल्या या भारतीयांनी युक्रेनमधील परिस्थितीही सांगितली आहे.
युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय (Indian) नागरिक आहेत. भारत सरकारने सर्व नागरिकांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. आलेल्या 242 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनला गेले आहेत. युक्रेनमधून मायदेशी परतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना भारतात नवीन जीवन मिळाल्याचे वाटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.