S. Jaishankar And Bilawal Bhutto
S. Jaishankar And Bilawal Bhutto Dainik Gomantak
गोवा

SCO Summit Goa 2023: बिलावल भुत्तो गोव्यात, 'पाक'ला भीती 'मिसाईल मिनिस्टर' जयशंकर यांची

Rajat Sawant

Bilawal Bhutto India Visit For SCO Summit 2023: आज आणि उद्या गोव्यातील बाणावली येथील एका बीच रिसॉर्ट मध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक होत आहे.

 या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होत आहेत.

दरम्यान, या परिषदेमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे बिलावल भुत्तो पहिले परराष्ट्रमंत्री ठरले आहेत.  (SCO Summit 2023 Goa)

बिलावल भारतात आले आहेत पण पाकिस्तानचे माजी राजदूत वेगळ्याच कारणासाठी चिंतेत आहेत. मोदी सरकारचे 'मिसाईल मिनिस्टर' म्हणून प्रसिद्ध असलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामुळे पाकिस्तान सध्या चिंतेत आहे.

पाकिस्तानचे माजी राजदूत तारिक जमीर यांनी याबाबत एक चर्चेत चिंता व्यक्त केली. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर पाकिस्तानवर ताशेरे ओढतील आणि पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल यांना निमूटपणे सगळं ऐकावं लागेल अशी भीती माजी राजदूतांनी व्यक्त केली आहे.

तर, बिलावल यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशातील संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे वक्तव्य मलीहा लोधी यांनी केले आहे.

एका भारतीय वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिना रब्बानी खार यांनी बिलावल यांच्या भेटीबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. "बिलावल यांचा हा भारत दौरा नसून ही शांघाय सहकार्य संघटनेची बैठकीसाठीचा दौरा आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता बिलावल यांच्या दौऱ्याकडे संबंध सुधारण्यासाठीचा दौरा म्हणून पाहिले जात आहे. आम्ही द्विपक्षीय संबध या विषयावर बोलत नसून या दौऱ्याकडे कोणत्याही प्रकारे द्विपक्षीय दौरा म्हणून पाहिले जाऊ नये" असे हिना यांनी सांगितले. यापूर्वी हिना रब्बानी खार 2011 मध्ये भारतात आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

SCROLL FOR NEXT