शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज आणि उद्या (04 आणि 05 मे) गोव्यातील बाणावली येथे होत आहे. यासाठी चीन, रशिया आणि पाकिस्तानसह सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री गोव्यात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. गुरूवारी सकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले आहेत.
तसेच, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो देखील आज सायंकाळपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत. दरम्यान, गोव्यात येण्यापूर्वी भुत्तो यांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली आहे.
काय म्हणाले पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो?
"शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीसाठी पाकिस्तान शिष्टमंडळासह मी आज गोवा, भारत येथे जात आहे. SCO बैठकीला आमची उपस्थिती पाकिस्तान या बैठकीला किती महत्व देते हे आधोरेखित करते. संघटनेच्या सदस्य देशांसोबत आम्ही सकारात्मक चर्चेची अपेक्षा करतो." असे बिलावल भुत्तोंनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गोव्यात येण्यासाठी कराची पाकिस्तान येथून शिष्टमंडळासह बिलावल भुत्तो निघाले असल्याची माहिती पाकिस्तान गृहमंत्राल्याच्या वतीने सार्वजनिक करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या.
दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील SCO बैठकीसाठी गोव्यात असून आज सकाळी त्यांची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. भारतासाठी SCO अध्यक्षपदासाठी दिलेल्या पाठिंब्याचे यावेळी जयशंकर यांनाी कौतुक केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.