Bike Thief arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील दुचाकी चोरीचा अखेर पर्दाफाश

आगशी पोलिसांनी एका संशयित चोरट्याला ठोकल्या बेड्या

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात दुचाकी चोरीचा पर्दाफाश झाला आहे. आगशी पोलिसांनी एका संशयित चोरट्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तब्बल चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गोव्याच्या विविध भागातून या दुचाकी चोरल्याची माहिती आहे.

पणजीजवळच (Panjim) असलेल्या आगशी भागातून एका 20 वर्षीय संशयित चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. वाल्लिसन किंडो असं या संशयिताचं नाव असून त्याच्याकडून आतापर्यंत चार दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या सर्व दुचाकी म्हापसा आणि कळंगुट भागातून चोरीस गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी चोरट्याला अटक करुन तपास सुरु केला आहे. चोरट्याने आणखी दुचाकी (Bikes) चोरल्या आहेत का याचा तपासही पोलिसांनी सुरु केला आहे.

दरम्यान नुकतीच वाडी-शिवोली येथील शेरॉन फर्नांडिस यांनी आपली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार शिवोलीच्या आऊट पोस्टवर केली होती. दुचाकी चोरांना आपल्या सहकाऱ्यांनी हणजुणे पोलिस (Police) स्थानकात आणले असता पोलिसांसमक्ष त्यांनी पलायन केल्याचा आरोपही फर्नांडिस यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT