Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Accident Death: वीज खांबाला धडक; कुळेचा दुचाकीस्वार ठार

Accident Death: शिगाव मिरियम फार्मजवळ रस्त्यालगतच्या वीज खांबाला पल्सर दुचाकीची धडक बसल्याने कुळे येथील दुचाकीस्वार अनीष कुजूर (वय 21वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

Accident Death:

शिगाव मिरियम फार्मजवळ रस्त्यालगतच्या वीज खांबाला पल्सर दुचाकीची धडक बसल्याने कुळे येथील दुचाकीस्वार अनीष कुजूर (वय 21वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीष कुजूर हा शिगावहून कुळेच्या दिशेने जात होता.

मिरियम फार्म येथे ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या वीज खांबाला दुचाकीची जोरात धडक बसली. त्यावेळी डोके आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अनीषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव सरकारी

इस्पितळात पाठविला आहे. कुळेचे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सदानंद देसाई अधिक तपास करत आहेत.

उत्कृष्ट फुटबॉलपटू हरपला

अनीष हा या भागात उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून परिचित होता. कुळे गावात होणाऱ्या फुटबॉल लीगमध्ये शिव शंकर संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळला होता. त्याच्या निधनामुळे या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhurandhar Review: क्षणोक्षणी थरार, अभिनयात जोश, क्रूरतेत धार; रणवीर सिंग-अक्षय खन्नासमोर आदित्य धर का ठरतोय 'धुरंधर?'

Vasco police: सजग पोलिसांमुळे गोवा सुरक्षित! कृष्णा साळकरांची स्तुतीसुमने; वास्को स्थानकात कामगिरीचे कौतुक

Sattari: सत्तरीला मॉडर्न बनवायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही! विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन; नगरगावात प्रचाराला प्रारंभ

गोव्याची 'शिखा' थायलंडमध्ये! साऊथईस्ट एशियन गेम्ससाठी Referee म्हणून निवड

Goa ZP Election: सासष्टीत भाजपकडून 3 च उमेदवार! 6 जागांवर अपक्षांना पाठिंबा; दक्षिण गोव्यात लढवणार 18 जागा

SCROLL FOR NEXT