Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: बसच्‍या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

Goa Accident Case: डिचोलीतील घटना : अर्धा तास होता रस्‍त्‍यावरच पडून

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: डिचोली येथील व्हाळशी आयटीआयसमोर प्रवासी बस आणि दुचाकी यांच्‍यात झालेल्या भीषण अपघातात आनंद नाईक (रा. बोर्डे) हे पन्नाशीतील इसम ठार झाला. ‘हाऊ’ या टोपणनावाने ते परिचित होते. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापशाहून होंड्याला जाणारी ‘रेश्मा’ नामक प्रवासी बस (जीए 04 टी 2096) व्हाळशी येथील आयटीआयसमोर पोचताच डाव्या बाजूने हाऊसिंग बोर्ड वसाहतीतून अचानक मुख्य रस्त्यावर आलेल्या मोटरसायकलला (जीए 04 डी 4650) जोरदार धडक बसली. त्‍यात मोटारसायस्‍वार आनंद नाईक हे ठार झाले.

जवळपास अर्धा तास ते रस्त्यावरच पडून होते. नंतर पोलिसांच्या रोबोट वाहनातून त्‍यांना डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्‍यांना मृत घोषित केले.

याच रस्‍त्‍याने घेतला होता भावाचाही बळी

मृत्यूचा सापळा बनलेल्या बोर्डे-व्हाळशी या रस्त्याने गेल्या महिनाभरात दोघांचे बळी घेतले. गेल्या सात वर्षांत या रस्त्याने अकरा जणांचे बळी घेतले आहेत. विशेष म्‍हणजे आज अपघातात बळी पडलेले आनंद नाईक यांच्‍या भावाचाही काही वर्षापूर्वी याच रस्त्यावर अपघातात बळी गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: 'भाऊबीजेची ओवाळणी ठरली शेवटची'! गोव्यातून परत येताना दुचाकी झाडावर आदळली; 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Birsa Munda Jayanti: भगवान 'बिरसा मुंडांच्या' 150 व्या जयंतीसाठी गोव्यात तयारी सुरू, तालुकावार जागृती कार्यक्रमांचे आयोजन

Watch Video: ताळगावमध्ये पावसाचं थैमान! स्कोडा शोरूमजवळ फूटपाथ कोसळला; रस्ता तात्काळ 'बंद'

'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

शेतकऱ्यांसमोर पुन्‍हा एकदा संकट! उरले सुरले पीकही हातचे जाण्याची भीती; म्हैसाळ धरण दुसऱ्यांदा भरले

SCROLL FOR NEXT