Goa Diwali 2023: नरकासुरांचा रात्रभर हैदोस! कर्णकर्कश संगीत; 50 ठिकाणी कारवाई; म्युझिक सिस्टीम जप्त...

Goa Diwali 2023: दीपावलीच्या आदल्‍या रात्री राज्यात पोलिस गस्त असूनही अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमांजवळ कर्णकर्कश आवाजात संगीत लावून नुसता हैदोस घालण्‍यात आला.
Goa Narkasur
Goa NarkasurDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Diwali 2023: दीपावलीच्या आदल्‍या रात्री राज्यात पोलिस गस्त असूनही अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमांजवळ कर्णकर्कश आवाजात संगीत लावून नुसता हैदोस घालण्‍यात आला. त्‍यामुळे नियमांचे उल्लंघन तर झालेच शिवाय कायद्याच्‍या चिंधड्या उडविल्‍या गेल्‍या.

Goa Narkasur
Diwali 2023: दीपावली: प्रथा, परंपरा व आख्यायिका

राजधानी पणजीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये गस्त ठेवून पोलिसांनी काही ठिकाणी संगीत बंद केले तर काहींना ताकीद देऊन संगीताचा आवाज कमी करण्यास भाग पाडले. रात्री 12 वाजेपर्यंतच संगीत वाजविण्‍यास मुदत असताना पहाटेच्‍या वेळी नरकासुर प्रतिमा दहन करताना पुन्‍हा कानठळ्या बसविणारे संगीत सुरू झाल्‍याने लोकांनी संताप व्यक्त केला.

राज्यात सुमारे 50 हून अधिक ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून म्युझिक सिस्टीम जप्त केली. पणजीत सर्वाधिक 7 म्युझिक सिस्टीम जप्त करण्‍यात केली. रात्री 12 वाजल्यानंतरही संगीत सुरू असल्याचे सुमारे दीडशेपेक्षा अधिक कॉल्स पोलिस नियंत्रण कक्षाला आले.

पणजी, मडगाव, फोंडा, वास्को तसेच म्हापसा येथील शहर भागात उभारण्यात आलेल्या नरकासुरांजवळ मोठ्या प्रमाणात म्युझिक सिस्टीम बसवण्यात आली होती. रात्री 12 वाजेपर्यंतची मर्यादा असल्याने दिवाळीच्‍या आदल्‍या दिवशी दुपारपासूनच धिंगाणा सुरू झाला होता.

पणजी परिसरात पाऊणशे नरकासुर!

पणजी पोलिस स्थानकाच्या हद्दीत लहान मोठे मिळून पाऊणशेच्या आसपास नरकासुर प्रतिमा रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यातील सुमारे 35 च्या आसपास मोठे नरकासुर होते. तेथील संगीताला काही ताळेबंद नव्‍हता. काही ठिकाणी पोलिसांनी संगीत बंद पाडले म्‍हणून मद्यधुंद युवकांनी थेट त्‍यांच्‍याशी हुज्जत घातली.

त्‍यामुळे पोलिसांनी बेधडक कारवाई करताना म्युझिक सिस्टीमच जप्त केली. पणजीप्रमाणेच इतर शहरांमध्ये अशीच स्थिती होती. प्रत्येक तालुक्यातील पोलिस स्थानकात सरासरी तीन ते चार प्रकरणे नोंद झाली आहेत. काही ठिकाणी रुग्‍णांना या कर्णकर्कश संगीताचा त्रास झाल्‍यामुळे त्‍यांना तातडीने वैद्यकीय मदत घ्‍यावी लागली.

Goa Narkasur
Goa Accident News: बसच्‍या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

बहुतांश युवक होते मद्यधुंद अवस्‍थेत

या कर्णकर्कश संगीताच्या तालावर युवकांनी नाच करण्याच्या नावाखाली अक्षरश: रात्रभर धिंगाणा घातला. बहुतांश युवक मद्याच्‍या नशेत होते. जसजशी संध्याकाळ जवळ येत होती तसतसा संगीताचा आवाज वाढत गेला. त्यामुळे लोकांची झोपच उडाली. वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना काही ठिकाणी वेळेवर पोहोचता आले नाही.

पोलिसांची चाहूल लागताच संगीताचा आज कमी केला जात होता. पोलिस गेल्‍यावर पुन्‍हा दारुड्यांच्‍या धिंगाणा सुरू व्‍हायचा. त्‍यामुळे वाहतुकीच्‍या कोंडीत आणखी भर पडत होती. अनेक ठिकाणी तर पोलिसांशी हुज्जत घालण्‍याइतपत या मद्यधुंद युवकांची मजल गेली. शेवटी पोलिसांना ताठर भूमिका घेऊन कारवाई करावीच लागली. मात्र पोलिसांची पाठ वळली की पुन्‍हा संगीत सुरू व्‍हायचे.

ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी कायद्यानुसार जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व पोलिस ठाणे प्रमुखांवर आहे. त्यांना सरकारने यंत्रे पुरविली आहेत. त्यांचा वापर त्यांनी केला असावा. आमच्‍याकडे मदत मागितली असती तर ती दिली असती.

- डॉ. महेश पाटील, अध्‍यक्ष, गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळ

ध्वनिप्रदूषणामुळे कायदा सुव्यवस्थेची पुरती वाट लागली. याचे काय विपरित परिणाम झाले ते अनेकांनी सोशल मीडियावर मांडले आहेत. उच्च न्यायालयाने याची स्वेच्छा दखल घेतली तरच सरकारला आपले कर्तव्य नीट समजेल.

- सबिना मार्टिन्स, निमंत्रक, बायलांचो साद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com