Accident News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: केवळ 'त्या' चिमुकल्याचे दैव बलवत्तर म्हणून...

दुचाकीची धडक; तरीही मूल बचावले, पळणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मुसक्या आवळल्या

गोमन्तक डिजिटल टीम

कुचेली येथे एका भरधाव दुचाकीस्वाराने तीन वर्षीय चिमुकल्याला जोरात धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. सुदैवाने हा मुलगा किरकोळ जखमी होऊन बचावला. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी संशयिताला अटक केली.

ही घटना मंगळवारी (ता.१३) दुपारी १.३० च्या सुमारास घडली. रस्ता ओलांडताना अंशकुमार बेन (वय ३ वर्षे) याला दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. संशयित राकेश पाटील (वय २१ वर्षे, रा. गणेशनगर-कोलवाळ) हा जीए-०३-एएल-८२६४ या दुचाकीवरून घोटणीचो व्हाळकडून कुचेली साईबाबा मंदिराच्या दिशेने जात होता.

कुचेलीत थरार

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चालकाने हेल्मेट परिधान केले नव्हते. रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकल्याला त्याच्या गाडीची जोरदार धडक बसते. त्यानंतर मुलगा रस्त्यावर पडतो.

अपघातानंतर दुचाकीस्वार पुढे काही अंतरावर जाऊन थांबतो आणि मागे वळून पाहतो. घरातील महिला धावत मुलाला उचलण्यासाठी येतात. मात्र, त्यांना पाहून दुचाकीस्वार घाबरून घटनास्थळावरून पोबारा करतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

हरमल : भोम-हरमल येथे एका वळणावर मोटारसायकल व स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला, तर एक जखमी झाला. १३ रोजी रात्री ११ च्या सुमारास स्कूटरवरून दोघेजण हरमलला येत होते.

त्यापैकी नेपाळी अनिल (वय २२ वर्षे) हा जबर जखमी झाला, तर अन्य एक बचावला. दुचाकीस्वार पिंगेश शहा (वय ३५ वर्षे, रा. मुंबई) हा पालयेकडे जाताना दोन्ही वाहनांची धडक होऊन तो जागीच ठार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

SCROLL FOR NEXT