Women's Taxi Service: अरेरे...महिला टॅक्सी सेवा पडली बंद

चालक अनुपलब्ध : कराराचे नूतनीकरण न केल्याने उपक्रम खंडित
Women's Taxi Service
Women's Taxi ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

Women's Taxi Service गोव्यात महिला टॅक्सीचालकांच्या अनुपलब्धतेमुळे कमी कालावधीत प्रसिद्ध पावलेली ''महिला टॅक्सी सेवा'' अयशस्वी ठरली. ही सेवा सध्या बंद आहे. ही सेवा चांगली चालायची आणि पर्यटक अजूनही या सेवेबद्दल विचारतात, असे काही महिला टॅक्सीचालक म्हणतात.

काही वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रात एक अनोखी सेवा सुरू केली होती, ज्यामध्ये महिला टॅक्सी चालवत होत्या. मात्र, पाच वर्षांच्या यशस्वी वावरानंतर ही सेवा बंद पडली.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले की, ही सेवा 2014 साली मिरामार येथे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत सुरू केली होती. सुमारे १० महिला चालक या टॅक्सी चालवत होत्या.

Women's Taxi Service
Panjim News: ... आणि अखेर सरपंचांना भरावे लागले तीन लाख

एक खासगी एजन्सी पाच वर्षे ही सेवा चालवत होती; परंतु कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कंपनीने कराराचे नूतनीकरण केले नाही आणि ही सेवा बंद झाली, असे नार्वेकर म्हणाले.

ही सेवा बंद करण्यामागचे कारण विचारले असता नार्वेकर यांनी या सेवेची चांगली जाहिरात करूनही काही कारणांमुळे काही महिला टॅक्सीचालकांनी सेवा सोडल्याचे उघड केले. महिला टॅक्सीचालकांच्या अनुपलब्धतेमुळे ही सेवा बंद केली, असे ते पुढे म्हणाले.

Women's Taxi Service
Equal Citizenship Act: ‘समान नागरी’साठी केंद्राकडून पुढाकार

पर्यटक अजूनही नावाजतात सेवा

रंजिता च्यारी म्हणाल्या की, त्या 30 टक्के कमिशन तत्त्वावर काम करत होत्या आणि व्यवसायही चांगला चालायचा. पण नंतर काही महिला चालकांनी लग्न, नोकऱ्या इत्यादी कारणांमुळे गोवा सोडला आणि आजपर्यंत आम्ही पाचजणी अजूनही टॅक्सी चालवतो.

तरीही काही आधीचे परिचयाचे पर्यटक गोव्यात आल्यावर भेटतात. आमच्या टॅक्सी भाड्याने घेणाऱ्या अनेक महिलांनी ही सेवा सुरक्षित असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com