Panaji Dainik Gomantak
गोवा

Crime News : गांजा प्रकरणात बिहारच्या तरुणाला अटक

Crime News : हा गांजा तो ताळगाव येथे ग्राहकाला विकण्यास आला होता. त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

पणजी, पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिहारच्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९४ हजारांचा गांजा जप्त केला. त्याचे नाव रमाकांत उमाकांत पांडे (४५) आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

ताळगाव येथील परिसरात रात्रीच्यावेळी ड्रग्स व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पदपणे फिरणाऱ्या इसमाला हटकले. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याची झडती घेतली असता आतमध्ये गांजासदृश पदार्थ होता.

त्याची चाचणी केली असता तो गांजा असल्याचे उघड झाले. हा गांजा तो ताळगाव येथे ग्राहकाला विकण्यास आला होता. त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. संशयित रमाकांत हा बेती येथे राहत असून मजुरीचे काम करतो. झटपट पैसे मिळवण्याच्या आशेने तो ड्रग्स विक्रीच्या व्यवसायात ओढला गेला होता. त्याला हा गांजा कोणी दिला होता याची चौकशी पोलिस करत आहेत. निरीक्षक राजाराम बागकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT