Doctor  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खून झालेल्या 'त्या' डॉक्टरला गावाकडे दवाखाना उघडायचा होता, पैसेही जमा केले होते...

खून केल्यावर डॉक्टरांचीच गाडी घेऊन पळून जाताना संशयित आरोपींना भिलवाडा राजस्थान येथे अटक करण्यात आली.

Pramod Yadav

बेतालभाटी येथे राहणाऱ्या डॉ. निर्वाण भारत या 27 वर्षीय आय स्पेशालिस्टचा खून त्यांच्याचकडे स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या सिमांचल परिदा (31) याने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. खून केल्यावर डॉक्टरांचीच गाडी घेऊन पळून जाताना संशयित आरोपींना भिलवाडा राजस्थान येथे अटक करण्यात आली. त्यापैकी दोघांना गोव्यात देखील आणण्यात आले.

निर्वाण दक्षिण गोव्यातील मडगावपासून 7 किमी अंतरावर भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याला गोवा आणि बिहारमधील मधेपुरा गावात लोकांच्या सेवेसाठी क्लिनिक उघडण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्याने पैसे जमा करून घरी ठेवले होते.

शयित आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल आणि गाडीच्या चोरीसाठी हा खनू करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, डॉक्टरच्या घरी राहणाऱ्या स्वयंपाक्याने हा हत्येचा कट रचला. 9 फेब्रुवारी रोजी गोवा पोलिसांकडून हत्येची माहिती निर्वाणच्या नातेवाईकांना मिळाली. निर्वाणच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली.

हत्येच्या दिवशी निर्वाणच्या डॉक्टर मित्राने त्याला रात्री उशिरा फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही हा दवाखान्यातून बेपत्ता होता, त्यानंतर देखील काही माहिती समोर आली नाही. दरम्यान, त्याचे मित्र घरी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

गोवा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह हातपाय बांधून बेडच्या पेटीत ठेवला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात करत आजूबाजूच्या सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली.

संशयाची सुई त्याच्यासोबत राहणार्‍या स्वयंपाकीकडे गेली, त्यानंतर पोलिसांनी मोबाईल टेहळणीवरून त्याला राजस्थानमधून अटक केली. निर्वाणच्या मृत्यूनंतर गावकरी मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT