हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेतली. सुखू गोव्यात खासगी दौऱ्यावर असताना रविवारी सायंकाळी उशिरा दोघांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली.
(Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu and Goa CM Pramod Sawant held a meeting )
"पर्यटन आणि गुंतवणुक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठीहिमाचल प्रदेश आणि गोवा सरकार सहकार्याने काम करतील. देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष पॅकेजेसही तयार करण्यात येणार आहेत." असे यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले.
"हिमाचल आणि गोवा ही देशातील प्रमुख पर्यटन राज्ये आहेत. दोन्ही राज्यांमध्ये जगातील उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून समोर येण्याची क्षमता आहे." असे मुख्यमंत्री सुखू म्हणाले.
पर्यटनामुळे लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. दोन्ही राज्यांच्या पर्यटन स्थळांना जोडणारे पर्यटन केंद्रीत सर्वसमावेशक पॅकेज विकसित करण्याची गरज आहे, जेणेकरून दोन्ही राज्यांमध्ये देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. दोन्ही राज्ये मिळून पर्यटन आणि व्यापाराच्या क्षेत्रात विशेष व्यवस्था निर्माण करू शकतात. असे सुखू म्हणाले.
समुद्र आणि पर्वतांच्या परिसंस्थेबद्दल परस्पर समज सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी महासागर-पर्वत थीम-आधारित विज्ञान कार्यशाळा आणि विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमांची मालिका सुरू केली आहे. यावर देखील यावेळी चर्चा दोघांमध्ये झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.