Goa Budget Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023-24: पशुपालकांसाठी मोठी बातमी! अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'ही' योजना

प्राण्यांच्या दवाखान्यांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Budget गोवा अधिवेशनात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केला. या शहर विकासासोबतच ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेषतः पशुपालक वर्गासाठी विशेष योजनांची माहिती दिली.

पशु संवर्धन खात्यासाठी 179.56 कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी जाहीर केलेय. पशुपालकांसाठी ही मोठी बातमी असून या योजनेद्वारा प्राण्यांच्या दवाखान्यांसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेय.

मागील काही दिवसांपूर्वी गोव्यातील पशुपालक लंम्पि आजारामुळे धास्तावले होते. गाईंमध्ये या रोगाची लागण झपाट्याने होत असून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे होते.

त्यामुळेच या रोगापासून जनावरांची मुक्तता करण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी त्यावेळी पशुपालकांनी केली होती. त्याच अनुषंगाने दुध देणाऱ्या जनावरांचे लसीकरण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिली.

आता मुख्यमंत्र्यांनी पशु संवर्धन खात्यासाठी 179.56 कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले असून याद्वारा प्राण्यांच्या दवाखान्यांसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसेच मुख्यमंत्री सुधारीत कामधेनू योजना राबवण्यात येणार असून त्याचाही पशुपालकांना फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT