Goa Budget: मडगावसह 4 शहरांसाठी CM सावंत यांचा मास्टरप्लान, झोपडपट्टी मुक्त करणार

गोव्याला देशाची सर्जनशील राजधानी बनवणार- सावंत
Goa Budget
Goa BudgetDainik Gomantak

गोवा अधिवेशनात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केला असून त्यात त्यांनी बरेच प्रस्ताव सादर केले. मडगाव, म्हापसा, फोंडा, वाळपई या शहरांसाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात येणार असून ही शहरे झोपडपट्टी मुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मध्यंतरी गोव्यातील गुन्हेगारीच्या अनेक घटनांमध्ये झोपडपट्टीतील लोकांचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गोव्यातील महत्वाच्या शहरातील झोपडपट्टी वसाहत हटवून गुन्हेगारी काहीशी कमी करण्याचा प्रयत्न या निर्णयाच्या अनुषंगाने घेण्यात येणार असल्याचे दिसून येतेय.

Goa Budget
Goa Tourism : अवैध धंद्यांपुढे सरकार हतबल; तेथे पंचायत काय करणार?

मडगाव, म्हापसा, फोंडा, वाळपई शहरांसाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात येणार असून हि शहरे अधिक विकसित करण्याकडे सरकारचा भरआहे. तसेच गोव्याला देशाची सर्जनशील राजधानी बनवणार असल्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com