Goa Tomato Price Hike Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market: टोमॅटो खातोय भाव! 10 रुपयांनी दरवाढ; वालपापडी स्वस्त, राज्याबाहेरील भाज्या महागण्याच्या वाटेवर

Goa Tomato Price Hike: दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेला टोमॅटो सध्या बाजारात भाव खात असून, गेल्या आठवडाभरात त्याच्या दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेला टोमॅटो सध्या बाजारात भाव खात असून, गेल्या आठवडाभरात त्याच्या दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजारात टोमॅटोचा दर प्रतिकिलो ५० रुपये होता. मात्र, त्यानंतर सोमवारपर्यंत दरात १० रुपयांची वाढ झाली आहे.यंदा हवामानात प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाला आहे.

त्यातच अवकाळी पावसामुळे टोमॅटोसह अन्य काही भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे संकेत बाजारातील विक्रेत्यांनी दिले आहेत. डिचोलीच्या बाजारात कर्नाटकातून भाज्यांची आवक होत असते. सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाग झालेली वालपापडी आता किंचित स्वस्त झाली आहे. वालपापडीचा दर प्रतिकिलो ४० रुपयांनी घसरला असून, सध्या तो २०० रुपये प्रतिकिलो इतका आहे.

अन्य भाज्यांचे दर स्थिर

अन्य भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. डिचोलीत कांदे व बटाटे प्रतिकिलो ४० रुपये दराने विकले जात आहेत. चिटकीमिटकी, भेंडी व अन्य भाज्या ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस आहेत. टोमॅटोसह अन्य भाज्यांच्या दरात आणखी वाढ होणार की नाही, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, अशी माहिती बाजारातील भाजी विक्रेते रमेश रेड्डी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT