Bicholim Walking Track Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीत ‘वॉकिंग ट्रॅक’वर पुन्हा अंधार! पथदीप नादुरुस्त, भिकाऱ्यांचा उपद्रव वाढला

Bicholim Walking Track: शहराच्या वैभवात भर घालणारा ‘वॉकिंग ट्रॅक’ पुन्हा एकदा अंधारमय बनला आहे. पथदीप पेटत नसल्याने रात्रीच्यावेळी या ‘वॉकिंग ट्रॅक’वर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शहराच्या वैभवात भर घालणारा ‘वॉकिंग ट्रॅक’ पुन्हा एकदा अंधारमय बनला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पथदीप पेटत नसल्याने रात्रीच्यावेळी या ‘वॉकिंग ट्रॅक’वर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. महिन्यापूर्वी ही समस्या निर्माण झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर ही समस्या दूर झाली होती. पण आता पुन्हा पथदीप बंद झाले आहेत.

पूल ते गावकरवाडापर्यंतच्या वॉकिंग ट्रॅकवर जवळपास ३१ पथदीपांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एकही पथदीप पेटत नाही, अशी माहिती या ‘वॉकिंग ट्रॅक’वर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांकडून देण्यात आली आहे. नादुरुस्त पथदीप एकतर दुरुस्त करावेत. नपेक्षा नवीन पथदीप बसवावेत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

शहरातील जुना पूल ते गावकरवाड्यापर्यंत नदीकाठी बांधण्यात आलेला हा बांध वजा ‘वॉकिंग ट्रॅक’ म्हणजे अनेकांचे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. मात्र, ‘ट्रॅक’वरील पथदीप पेटत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. अंधारामुळे महिलांत भीती पसरली आहे.

सुरक्षिततेकडे लक्ष द्या!

‘वॉकिंग ट्रॅक’ म्हणजे शहरवासीयांसाठी वरदान ठरलेला आहे. महिला, वृद्ध मिळून शेकडो नागरिक नियमितपणे वॉकिंग ट्रॅकवर शतपावलीसाठी येतात. वॉकिंग ट्रॅकवर मनमोकळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या ट्रॅकवरील पथदीप आदी गैरसोयीकडे सरकारने लक्ष घालून, महिलांमधील भीती दूर करावी, अशी मागणी वॉकिंग ट्रॅकवर नियमित येणाऱ्या शिवकुमार, सुभाष धारगळकर आणि संजू वेर्णेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

Bangladesh Violence: बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांचं पाशवी कृत्य! हिंदू कुटुंबावर हल्ला करुन घर दिलं पेटवून; जीव वाचवण्यासाठी धडपड VIDEO

Pooja Naik: 'पूजा नाईक' प्रकरणावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी! 26 लाखांचा गुन्हा 17 कोटींवर कसा गेला? सरदेसाईंच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

SCROLL FOR NEXT