Bicholim: चिंताजनक! डिचोलीत स्वच्छतादूतांनी गोळा केला दहा पोती गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण

Bicholim News: दर रविवारी शहरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या स्वच्छतादूतांनी आज (रविवारी) शहरातील कदंब बसस्थानक परिसरात स्वच्छता केली.
Tobacco consumption Goa
Tobacco consumption BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शहरात गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण चिंताजनक असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्वच्छतादूतांनी आज (रविवारी) शहरातील कदंब परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी स्वच्छतादूतांनी तब्बल दहा पोती गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची रिकामी पाकिटे गोळा केली. यावरून बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ सेवन होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दर रविवारी शहरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या स्वच्छतादूतांनी शहरातील कदंब बसस्थानक परिसरात स्वच्छता केली. दरदिवशी सकाळी ज्याठिकाणी मजुरीच्या प्रतीक्षेत मजूर थांबतात, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची रिकामी पाकिटांचा खच पडल्याचे स्वच्छतादूतांच्या निदर्शनास आले. विलंब न करता स्वच्छतादूतांनी हा कचरा गोळा केला, त्यावेळी तब्बल दहा पोती तंबाखूजन्य कचरा आढळून आला.

Tobacco consumption Goa
Bicholim Mining: डिचोलीत रात्री खनिज वाहतूक सुरूच? पिळगाव ग्रामस्थांकडून पुरावे सादर; निर्देशांच्या पालनाचा 'वेदांताचा' दावा

नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांच्यासह राजेंद्र सावईकर, व्यंकटेश नाटेकर, कॅजीटन वाझ, सूर्यकांत देसाई, भारतेश गुळणवार, रोहिदास पळ, अरुण मांद्रेकर, विश्वास गावस मिळून चौदा स्वच्छतादूत स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

बसस्थानक परिसरात आढळून आलेला गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांचा कचरा ही भयानक तेवढीच चिंताजनक बाब आहे. शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन होत आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध येणे काळाची गरज आहे. त्यासाठी पालिका कडक पावले उचलणार आहे.

विजयकुमार नाटेकर, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com